पोलादपूरच्या तरुणांना मनसेचे आवाहन; महाड एमआयडीसी प्रश्नांवर धडक मोर्चाला पाठिंबा देण्याचे आवाहन
पोलादपूर, प्रतिनिधी – सिद्धेश पवार
महाड एमआयडीसीतील कामगार व स्थानिक युवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लवकरच धडक मोर्चाचे आयोजन दि ११जून रोजी सकाळी अकरा वाजता एमआयडीसी प्राधिकरण विभागीय कार्यालयात कडे करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष श्री. राज पार्टे यांनी दिली आहे. या मोर्चाला पोलादपूरसह परिसरातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा द्यावा, असे आवाहन मनसेच्या दक्षिण रायगड विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाड एमआयडीसीमध्ये रोजगारासाठी पोलादपूर तालुक्यातील अनेक तरुण-तरुणी दररोज ये-जा करतात. तर काही तरुणांचा रात्रपाळी तसेच दुपारपाई जाताना येताना अपघात होऊन व्यक्तिमतही पडले त्यांना वारंवार घडत असून घटना झाल्या की फक्त आवाज उठतो परंतु नंतर जैसे थे याच प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बससेवेचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. या प्रश्नासह स्थानिक कामगारांच्या विविध मागण्यांसाठी एमआयडीसी प्राधिकरण विभागावर मनसेच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बससेवेचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. या प्रश्नासह स्थानिक कामगारांच्या विविध मागण्यांसाठी एमआयडीसी प्राधिकरण विभागावर मनसेच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
मनसेने नेहमीच मराठी माणसाच्या हक्कांसाठी संघर्ष केला असून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारामध्ये प्राधान्य मिळावे, कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच कामगारांचे प्रश्न सोडवावेत, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
याशिवाय महाड एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या सावित्री धरणाचा मूळ स्रोत पोलादपूर परिसरात असल्याने येथील स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिक संधी मिळाव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
कामगारांचे प्रश्न, रोजगार, वाहतूक सुविधा आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाला पक्षीय भेद विसरून सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण रायगड विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times