भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

ठुनामाच्या जयघोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

पुणे, दि. १८: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली.

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी….  ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुनील शेळके, आमदार विजय शिवतारे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प.

विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.

दर्शन व पूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती वारकरी माऊलींना वंदन केले. मंदिर संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली.

महापुजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट