सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

महाराष्ट्राला मिळणार १ल्या महिला उपमुख्यमंत्री ! उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवारांचा होकार

अजित पवारांच्या निधनाने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गुरुवारी अजित पवारांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. शुक्रवारी राख सावडण्याचा विधी झाला. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली. या विलिनीकरणा दरम्यान सुनेत्रा अजित पवार शुक्रवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.


उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी होकार दिला आहे अशी माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाने विलिनीकरणापुर्वी पक्षनेता निवडण्यासाठी हालचाली वाढवल्या. सुनेत्रा पवारांना विधिमंडळ पक्षनेता बनवण्याचे प्रयत्न असल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट केले. पक्षनेता ठरवण्यासाठी उद्या बैठक होऊ शकते. त्यानंतर त्याच दिवशी शपथविधी होऊ शकतो असे भुजबळ म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेता निवडीच्या पार्श्वभुमीवर अजित पवार गटाच्या नेत्यांची तातडीची बैठक रात्री सुरू झाली राष्ट्रवादीच्या ५ नेत्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला सुरुवात घेण्यात आली. यात मंत्रिमंडळात कोणाला कोणाला कुठले स्थान द्यायचे याबाबत चर्चा होऊन त्यानंतर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत.

उद्या शपथविधीची दाट शक्यता मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ४१ आमदारांचा सुनेत्रा पवार यांच्या नावाला पूर्ण पाठिंबा असून तसे अधिकृत पत्र राज्यपालांना दिले जाणार आहे. सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडल्यास उद्याच शनिवारीच (दि. ३०) सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडू शकतो. सध्या राष्ट्रवादीचे पाच प्रमुख नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्यांच्या वाटपाबाबत चर्चा करत आहेत. प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही आज रात्री उशिरा महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे.

निवडणूक बिनविरोध होणार !

• सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा सदस्य आहेत. त्या उपमुख्यमंत्री * झाल्यास त्यांना ६ महिन्यांच्या आत विधानसभेवर निवडून येणे बंधनकारक असेल. अशा वेळी बारामती विधानसभा मतदारसंघातून त्या स्वतः पोटनिवडणूक लढवतील आणि ही निवडणूक 'बिनविरोध' होण्याची दाट शक्यता आहे.

• सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यास राज्यसभेची एक जागा २ रिक्त होईल. त्या जागी पार्थ पवार की जय पवार, यापैकी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

रिपोर्टर

  • Krutika Tushar Khanvilkar
    Krutika Tushar Khanvilkar (director)

    With an MBA in Marketing (First Class with Distinction) and a deep passion for business strategy and innovation, I aim to bring new ideas to life through clarity, creativity, and strong leadership. As the Director of The Global Times, I focus on driving growth, building meaningful collaborations, and creating opportunities that make an impact. My vision is to take our brand to global heights — through digital innovation, smart planning, and ethical business practices. I’m constantly learning, evolving, and planning to pursue my PhD further — because growth never stops.
    Dedicated to empowering teams, inspiring people, and setting new standards of excellence in the industry.

    Krutika Tushar Khanvilkar

संबंधित पोस्ट