सोलापूरचा ओंकार जाधवने केले स्वातंत्र्यदिनी किलिमांजारो सर
मोशी (टांझानिया): मुळचा सोलापूरकर असलेला गिर्यारोहक ओंकार रामचंद्र जाधव यांने १५ ऑगस्ट २०२५ रोजी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो (१९,३४० फूट) सर करून तिरंगा फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा केला.
११ ऑगस्ट रोजी मोशी (टांझानिया) येथून मोहिमेला सुरुवात झाली. तब्बल ९० किमी अंतराची कठीण चढाई पार करून १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजता -१५ अंश तापमानात शिखर गाठण्यात आले. शिखरावर पोहोचताच ओंकार यांनी भारताचा तिरंगा फडकावला तसेच अवयवदान मोहिमेचा संदेश देत त्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
ओंकार यांनी यापूर्वी एव्हरेस्ट बेस कॅम्प (२०२१) सर केला असून सह्याद्रीतील अनेक किल्ले सर करण्याचा अनुभव त्यांना आहे.
360 एक्सप्लोरर व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचे मार्गदर्शन-
ही मोहीम 360 एक्सप्लोरर आंतरराष्ट्रीय साहसी पर्यटन संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली होती. या संस्थेची स्थापना २०१७ मध्ये सोलापूरचे पहिले एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केली असून आज ती जगभरातील गिर्यारोहकांना साहसासाठी मार्गदर्शन करते.
आफ्रिकेतील टांझानियामध्ये असलेले माउंट किलिमांजारो (१९,३४१ फूट) हे खंडातील सर्वात उंच पर्वत असून जगभरातील गिर्यारोहकांचे स्वप्न आहे. हा पर्वत ज्वालामुखीजन्य असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून जवळपास ६ किमी आहे. किलिमांजारोवर चढाई करताना सर्वात मोठा धोका म्हणजे अत्यंत वेगाने बदलणारे हवामान व अत्यल्प ऑक्सिजनमुळे होणारा AMS (Acute Mountain Sickness). सुरुवातीला हिरवेगार जंगल, नंतर कोरडी टुंड्रा, आणि अखेरीस बर्फाच्छादित शिखर – अशा विविध पट्ट्यांतून गिर्यारोहकांना प्रवास करावा लागतो. या दरम्यान थंडी, ऑक्सिजनची कमतरता, डिहायड्रेशन, तसेच शारीरिक व मानसिक थकवा हे धोके सतत जाणवत राहतात. अनुभव नसल्यास किंवा चुकीच्या गतीने चढाई केल्यास उंचीशी जुळवून घेणे अवघड ठरते. त्यामुळेच योग्य अक्लिमटायझेशन, मार्गदर्शन व शिस्तबद्ध नियोजन केल्याशिवाय किलिमांजारोवर चढाई करणे धोकादायक ठरू शकते.
ओंकारने हे शिखर सर करून सोलापूरच्या शिरात मानाचा तुरा रोवला आहे.
"ओंकारसारख्या तरुण गिर्यारोहकांना किलिमांजारोसारख्या शिखरावर घेऊन जाण्याचा व मार्गदर्शन करण्याचा अभिमान आहे. ३६० एक्सप्लोररच्या माध्यमातून अनेकांना अशा आव्हानात्मक मोहिमांचा अनुभव घेता येतो, हेच आमचे ध्येय आहे."
- आनंद बनसोडे
"माझ्या वडिलांची इच्छा होती की मी साहसी फिल्डमध्ये काहीतरी करावे. त्यांच्यानंतर त्यांच्या इच्छेने या फिल्डमध्ये आलो आणि हे यश त्याच्या आठवणींना समर्पित आहे"
- ओंकार जाधव
रिपोर्टर
Suhas Kamble (sub editor)
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble