ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते दत्तात्रय सखुबाई शंकर यादव (सहा. पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस स्टेशन, ठाणे शहर) यांनी पोलीस सेवेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे शहरतर्फे प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. तेव्हाचे छायाचित्र.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका वृक्षप्रेमी नागरीकांना आवाहन करण्यात येते की, पर्यावरणाच्या दृष्टीने भिवंडी शहरात सन २०२५-२६ मान्सून काळात शासन धोरणानुसार मोठया प्रमाणात वृक्षलागवड व संवर्धन बाबतची मोहीत महानगरपालिकेने हाती घेतलेली आहे. त्यानुसार ५ जुन २०२५ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन शहरात वृक्षप्रेमी नागरीकांकडून " हर घर एक झाड" अभियान अंतर्गत मोठया प्रमाणात वृक्षलागवड करण्यात यावी त्याकरिता महानगरपालिकेकडून वृक्षरोपे उपलब्ध करुन देण्यात येत असून, लागवड केलेल्या वृक्षरोपांचे जतन व संवर्धनाबाबतचे जि.ओ. टॅगींग फोटो महानगरपालिकेच्या ट्विटरवर प्रसारीत करण्यात येऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे वृक्षप्रेमी नागरीकांस मा. प्रशासक तथा आयुक्त सो, भिवंडी नि. शहर महानगरपालिका यांचेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सिद्धकला प्रिंट मीडीया अॅण्ड पब्लिकेशनचे डायरेक्टर तुषार खानविलकर, कृतिका खानविलकर, तेजल खानविलकर