सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का...

भाजपाला सर्वात मोठा धक्का...

खा. धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलीमा पाटील यांचा दारुण पराभव, 

सुधागड वासियांनी स्वाभिमान राखला.
सुधागड सन्मान आघाडीच्या शर्मिला बोडके २९३१ मतांनी विजयी..

निशांत पवार,
पाली, रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुधागडात अभूतपूर्व निकाल पाहायला मिळाला. मातब्बर नेते विरुद्ध निष्ठावंत कार्यकर्ते अशी लढत पाहायला मिळाली. या लढतीत जांभूळपाडा गटात शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला शरद बोडके यांनी खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी भाजप च्या नीलिमा पाटील यांचा दणदणीत पराभव केला आहे. निलिमा पाटील यांना ७१२९ मते पडली तर शर्मिला बोडके ह्यांना १००६० मते पडली.
जांभूळपाडा गटात शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला शरद बोडके यांनी २९३१ मतांनी विजयी संपादन केला.
राज्यपातळीवरील मोठे नेतृत्व आणि संसदीय बळ असूनही झालेला हा पराभव भाजपसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरतो आहे.
           जांभूळपाडा गणात मात्र भाजपच्या जागृती राजेश मानकर यांनी शेकापचे अतिश गोविंद सागळे यांचा पराभव करत भाजपला दिलासा दिला. जागृती मानकर यांना ४१७८, तर अतिश सागळे यांना ३३६५ मते मिळाली. त्या ८१३ मतांनी विजयी झाल्या.
परळी गणात शिवसेना (उबाठा) गटाच्या प्रणिता राजेश परदेशी यांनी भाजपच्या सुनंदा विठ्ठल सिंदकर यांचा पराभव केला. प्रणिता परदेशी यांना ५६८३, तर सुनंदा सिंदकर यांना ३०९५ मते मिळाली. या लढतीत प्रणिता परदेशी २५८८ मतांनी विजयी झाल्या.
राबगाव गणात भाजपच्या सुनीता किसन लेंडी यांनी शेकापच्या मनिषा भरत डोके यांचा पराभव केला. सुनीता लेंडी यांना ४१८८, तर मनिषा डोके यांना ३२४२ मते मिळाली. त्या ९४६ मतांनी विजयी झाल्या.
राबगाव गटात भाजपचे चंद्रकांत कृष्णा वारगुडा यांनी शेकापचे काशिनाथ ताया हंबीर यांचा पराभव करत १८७४ मतांची आघाडी घेतली. वारगुडा यांना ९८०७, तर हंबीर यांना ७९३३ मते मिळाली.
अडुळसे गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे संदेश परशुराम शेवाळे यांनी शेकापचे मिलिंद भिकू शेळके यांचा पराभव केला. शेवाळे यांना ५६९०, तर शेळके यांना ३६७२ मते मिळाली. ते २०१८ मतांनी विजयी झाले.
एकूणच या निकालांवर नजर टाकली असता, सुधागड तालुक्यात कोणत्याही एका पक्षाचे वर्चस्व दिसून येत नसून मतदारांनी प्रत्येक गट व गणात वेगवेगळा निर्णय दिला आहे. मात्र खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नींचा पराभव हा या निवडणुकांचा राजकीय केंद्रबिंदू ठरला असून, आगामी काळात तालुक्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा निकाल म्हणून याकडे पाहिले जात आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट