..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या अपघाती निधनावर आता त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजितदादांचा बारामतीला जाण्याचा प्लॅन ऐनवेळी बदलला की कुणाकडून बदलवला गेला हे पाहावं लागेल असं रोहित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून अजितदादा खूप काळजी घ्यायचे, त्यांनी प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणीही प्यायचं बंद केलं होतं अशी माहिती रोहित पवारांनी दिली. त्याचसोबत विमान प्रवास किंवा हेलिकॉप्टर प्रवास करताना खात्रीच्या व्यक्तीचे हेलिकॉप्टर वापर असा सल्ला दादांनी आपल्याला दिल्याची आठवण रोहित पवारांनी सांगितली.
DGCA चा मोठा निर्णय, VSR चं ऑडिट होणार
बारामती येथे झालेल्या अजित पवारांच्या विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच DGCA ने मोठी कारवाई सुरू केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीमध्ये M/s VSR Ventures Pvt Ltd या कंपनीचं Learjet 45 (VT-SSK) विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर, DGCA ने गैर-निर्धारित म्हणजेच नॉन-शेड्यूल विमान ऑपरेटरांचे विशेष सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. DGCA कडून हे विशेष सेफ्टी ऑडिट टप्प्याटप्प्याने राबवले जात असून, 4 फेब्रुवारी 2026 पासून या ऑडिटची सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या ऑपरेटरांचा समावेश करण्यात येत आहे. M/s VSR Ventures Pvt Ltd या कंपनीचाही या ऑडिटमध्ये समावेश आहे. DGCA च्या या कारवाईचा मुख्य उद्देश म्हणजे सुरक्षा निकषांची सखोल तपासणी करणे आणि भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळणे हा आहे. बारामती विमान अपघातानंतर DGCA ने उचललेलं हे पाऊल नॉन-शेड्यूल विमानसेवेच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचं मानलं जात आहे.
अजित पवार याचे 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला येताना विमान अपघातात निधन झालं. या घटनेच्या 13 दिवसानंतर आता रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्यावर काही प्रश्न उपस्थित केले. रोहित पवारांनी यासंबंधी त्यांच्याकडे असलेले तथ्येही समोर आणले.
विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती. त्यामुळे आधीच काही गोष्टी समजल्या नाहीत. विमान अत्यंत खालच्या अंतरावरून उडत होतं, मग तिथे EGPWS इशारा दिला होता की नाही? त्याचा अलर्टचा
आवाज का आला नाही? असे काही प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले.
कंपनीला हेव्ही बेस मेंटेनन्स करता येत नव्हतं का? तसा अहवाल कुणी दिला? या प्रकरणी क्लिअरर इंजिनिअर, क्वालिटी इंजिनिअर आणि मेंटेनन्स इंजिनिअरवर कारवाई केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
रोहित पवारांनी विचारलेले 10 प्रश्न
- अजितदादा बारामतीला कारने जाणार होते. पण एका नेत्याच्या सांगण्यावरून फाईलवर सही करण्यासाठी दादा थांबले. त्याला उशीर झाला. तसेच त्यांच्या पक्षाचा एक नेता त्यांना भेटण्यासाठी उशीरा आला. उशीर झाल्यामुळे दादांनी विमानाने जायचं ठरवलं. अजितदादांचा प्लॅन कुणी बदलवला का?
- दादा ज्या विमानातून जाणार होते त्या विमानाचा पायलट आणि को पायलट, दोघेही ऐनवेळी का बदलवण्यात आले ?
- दादांच्या विमानाने दुसरा गो अराऊंड का घेतला नाही? कंपनीने पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का? कुणाच्या जीवापेक्षा इंधन वाचवणे महत्त्वाचं होतं का?
- व्हीएसआर कंपनीच्या विमानात काय बिघाड झाला होता? ते खाली येताना एका बाजूला कलल्याचं दिसलं, त्यामागे कारण काय? मेकॅनिकल फेल्युअर झालं असावं काय ?
- टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाची पाहणी झाली होती का? विमानाचा टेकलॉग कुठे आहे? एअरवी रिपोर्ट कुठे आहे?
- विमानाचा रूटिन मेंटेनन्स झालं नव्हतं का? ते कुणी केलं होतं? विमानाचा हँगर सीसीटीव्ही कुठे आहे?
- विमानाचा हेव्ही मेंटेनन्स कधी झाला होता? त्याचा अहवाल कुठे आहे?
- व्हीएसआर कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण भारतात यावर काहीच कारवाई का करण्यात आली नाही?
- या आधी व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. पण त्यावर पुढे काहीही तपास झाला नाही. दोन वर्षांपासून त्याचा रिपोर्ट आला नाही. तो रिपोर्ट दाबण्यात आला का?
- सुमीत कपूर या पायलटवर दारू प्यायल्यामुळे तीन वर्षे बंदी आणली होती अशी माहिती आहे. मग अशा पायलटला व्हीआयपी लोकांच्या विमानाचा पायलट का बनवलं?
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
Tejal KhanvilkarWith an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.