..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

मोबाईल ओटीपीमुळे होणा-या ऑनलाइन चोरीला आळा घालण्यासाठी एअरटेलची “फ्रॉड अलर्ट” सुविधा

मोबाईल ओटीपीमुळे होणा-या ऑनलाइन चोरीला आळा घालण्यासाठी एअरटेलची “फ्रॉड अलर्ट” सुविधा


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ग्राहकांना सायबर भामट्यांपासून सुरक्षित ठेवणार


मुंबई, ११ फेब्रुवारी २०२६: स्पॅम आणि ऑनलाइन फसवणूकीच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी एअरटेलने आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून ‘फ्रॉड अलर्ट’ ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवी अत्याधुनिक सुविधा सुरु केली आहे. ‘फ्रॉड अलर्ट’ ही नाविन्यपूर्ण प्रणाली ग्राहकांच्या वन-टाइम पासवर्ड संबंधित बँक फसवणूकींपासून तत्काळ प्रभावीपणे संरक्षण देते. ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने संशयास्पद व्यवहार ओळखते.  सवणूकीचे व्यवहार होण्याची शक्यता असल्यास ही प्रणाली तत्काळ ग्राहकांना संबंधित व्यवहाराबद्दल सूचित करते. त्यामुळे एअरटेलचे ग्राहक ऑनलाइन फसवणूकीच्या व्यवहारातून पूर्णपणे सुरक्षित झाले आहे. 

घरात ऑनलाईन ऑर्डरच्या माध्यमातून येणारे पार्सल किंवा अन्नपदार्थांचे वितरण होण्याकरिता ग्राहकांच्या मोबाईलनंबरवर येणा-या ओटीपीची मागणी केली जाते. घरपोच होणारे वितरण स्विकारताना अनेकांची लगबग सुरु असते. सायबर भामटे लोकांची होणारी धावपळ लक्षात घेत त्याचा गैरफायदा घेतात. अनेकदा वस्तू वितरण करण्याच्या बहाण्याने किंवा तातडीची सेवा देण्याच्या नावाखाली हे सायबर भामटे ग्राहकांकडून ओटीपीची मागणी करतात. कामाच्या व्यापात अडकलेल्या ग्राहकाला संबंधित ओटीपी हा बँकेऐवजी वितरणसेवेशी संबंधित असल्याचा गैरसमज होतो. प्रत्यक्षात हा ओटीपी ग्राहकांच्या बँकेतील व्यवहारांशी संबंधित गोपनीय ओटीपी असण्याची शक्यता असते. ग्राहकांकडून अनावधानाने दिलेला ओटीपी सायबर भामटे ऑनलाइन चोरीकरिता वापरुन ग्राहकांना लुबाडतात. 

एअरटेलची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवी यंत्रणा अशा संभाव्य धोक्यांना वेळीच ओळखते. ग्राहकांना तातडीने सावध करते. मोबाईलवर एखाद्या संशयास्पद कॉलदरम्यान बँकेचा ओटीपी संदेश आल्यास ही यंत्रणा सतर्क होते. मोबाईलवर आलेल्या संदेशातून फसवणूक होत असल्याचे ग्राहकांच्या निदर्शनास आणून देते. फ्रॉड अलर्ट ही यंत्रणा ग्राहकांचा कॉल सुरु असला तरीही बँक व्यवहारासाठी ओटीपी स्विकारण्याचा धोका लक्षात आणून देण्यास मदत करते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी निर्णयक्षमता यांचा हा प्रभावी मेळ ग्राहकांना विचार करण्यासाठी, संबंधित फसवणूकीच्या घटनेची खातरजमा करण्यासाठी, स्वतःहूनच आपापली सुरक्षितता करण्यासाठी गरजेयुक्त वेळ उपलब्ध करुन देतो. परिणामी, ग्राहक ऑनलाइन चोरींच्या घटनांपासून सुरक्षित राहतात.

  एअरटेलच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नव्या प्रणालीबाबत एअरटेल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शाश्वत शर्मा यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘‘एअरटेल हे सुरक्षित नेटवर्क असावे, हे आमचे ध्येय आहे. एअरटेल सुरक्षित ठेवण्याकरिता उपाययोजना शोधताना आम्हांला मोबाईलमधील वनटाइम पासवर्ड (ओटीपी)च्या माध्यमातून होणारा चोरीचा मार्ग लक्षात आला. डिजिटल व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी ओटीपी महत्त्वाची भूमिका साकारत असले तरीही चोरीसाठीही ओटीपीचा गैरवापर होतो. यावर उपाययोजना म्हणून आम्ही तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्याचे ठरवले. एअरटेल नेटवर्कमध्ये या तंत्रज्ञानच्या मदतीने ग्राहक ऑनलाइन चोरींपासून सुरक्षित असल्याचे आम्हांला निश्चितच समाधान आहे.  

आमच्या नव्याने विकसित आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या प्रणालीतून थेट नेटवर्क स्तरावर काम केले जाते. सायबर भामट्यांकडून फसवणूकीच्या हालचाली सुरु होताच ही यंत्रणा संभाव्य धोके ओळखते. वेळीच हस्तक्षेप करुन सायबर गुन्हे रोखते. सायबर फसवणूकीच्या घटना आटोक्यात आणण्यात ही प्रणाली अत्यंत अचूकतेने आणि प्रभावीपणे काम करत असल्याचे विविध चाचण्यांतून सिद्ध झाले आहे.’’

रिपोर्टर

  • Suhas Kamble
    Suhas Kamble (sub editor)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Suhas Kamble

संबंधित पोस्ट