..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत मिताली - घुफ्रान जेते

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत मिताली - घुफ्रान जेते 

शिवाजी पार्क जिमखाना आयोजित महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सारस्वत बँक पुरस्कृत १७ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरला २५-१४, २५-० असे सरळ आणि सहज दोन सेटमध्ये हरवून विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीच्या या सामन्यात घुफ्रानने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड ठेवली होती. तर महिला एकेरीच्या अंतिम लढतीत मुंबईच्या मिताली पाठकने मुंबईच्या रिंकी कुमारीला २५-१२, २१-९ असे सहज पराभूत करून विजयावर आपले नाव कोरले. पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या सागर वाघमारेला २५-०, २३-७ असे हरवले. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने 

बाजी मारली. तिने ठाण्याच्याच चैताली सुवारेला १७-१५, २५-११ असे सहज चीत केले. 

                   प्रमुख अतिथी लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते विजेत्या खेळाडूंना चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शिवाजी पार्क जिमखान्याचे विश्वस्थ श्रीमती लता देसाई, प्रकाश नायक, महेंद्र ठाकूर, दीपक विश्वासराव, व्हाईस चेअरमन विश्वास नेरुरकर, सरचिटणीस संजीव खानोलकर, सह चिटणीस सुनील रामचंद्रन, इनडोअर खेळ सचिव सनिल समेळ, खजिनदार सी ए विलास सोमण, कार्ड सचिव अजय पाटणकर, कॅन्टीन सचिव आशुतोष जोगळेकर व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार आणि सहसचिव केतन चिखले व डॉ अनिल नेरुरकर उपस्थित होते. 

पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे.

महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि सागर वाघमारे ( पुणे ) २५-१७, २५-२

अभिजित त्रिपनकर ( पुणे ) वि वि झैद अहमद फारुकी ( ठाणे ) २३-१९, २५-०

महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे. 

रिंकी कुमारी ( मुंबई ) वि वि चैताली सुवारे ( ठाणे ) २५-२, २५-३

मिताली पाठक ( मुंबई ) वि वि समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) २५-१०, ५-२५, २१-८

रिपोर्टर

  • Suhas Kamble
    Suhas Kamble (sub editor)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Suhas Kamble

संबंधित पोस्ट