सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

शाळा प्रशासनासह पालकांमध्ये गोंधळ

पनवेलमधील शाळा सुरू होण्यास लागणार उशीर 

पनवेल ः कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर तब्बल दहा महिन्यांच्या मोठ्या सुट्टीनंतर रायगड जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळांची बुधवारी (दि. 27) घंटा वाजली. मात्र पनवेल पालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्यासाठी शाळा प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली नाही. तसेच पालकांच्या मनातही चलबिचल असल्याने शाळा सुरू होण्यास फेब्रुवारी महिना उगवणार असल्याचे दिसून येत आहे. 

कोरोनासंदर्भातील सर्व उपाययोजना अंमलात आणून व सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. 1 हजार 930 शाळांमधून 99 हजार 163 विद्यार्थ्यांपैकी 15 हजार 356 विद्यार्थ्यांनीच आज शाळेत हजेरी लावली. तर, अनेक शाळा आज बंदच होत्या. 2687 शिक्षकांची कोविड चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी एकही शिक्षक कोरोना संसर्गित असल्याचे आढळून आलेले नाही. पनवेल पालिका क्षेत्रातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू करण्याची परवानगी आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे दिली होती. मात्र शाळा सुरू करण्यासाठी शाळा प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली नाही. तसेच पालकांच्या मनातही चलबिचल असल्याने शाळा सुरू होण्यास फेब्रुवारी महिना उगवणार असल्याचे दिसून येत आहे. 

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविडचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. पालिकेच्या स्वतःच्या 10 शाळांसह संपूर्ण पालिका क्षेत्रात सर्वच माध्यमांच्या 250 पेक्षा जास्त शाळा आहेत. कोविडच्या प्रादुर्भावामुळे अनेक महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून 27 जानेवारीपासून या शाळा सुरू करण्यास शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे म्हटले होते. मात्र अद्यापही शाळा सुरू करण्याबाबत शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये गोंधळ कायम असल्याने शाळा सुरू होण्यास उशीर लागणार असल्याचे दिसून येत आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची कोविड टेस्ट, शाळांचे सॅनिटायझेशन आदी बाबी पूर्ण करणे गरजेचे असल्याने शाळा या तयारीला लागल्या आहेत. याव्यतिरिक्त शाळा सुरू करण्यास पालक, मुलांची काहीच हरकत नसल्याचे संमतीपत्र शाळा लिहून घेत असल्याने या संपूर्ण प्रक्रियेला आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे. पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या एकूण दहा शाळा आहेत. या शाळेतील शिक्षकांनी आपली कोरोना चाचणी केली आहे. त्याचे अहवाल प्रलंबित असल्याने शाळा 27 पासून सुरू झाल्या नसल्याची माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब चिमणे यांनी दिली.

विद्यार्थ्यांकडून घेतले जात आहे संमतीपत्र 
शाळा सुरू झाल्यावर कोविडची साथ पसरली अथवा विद्यार्थ्यांना कोविडची लागण झाल्यास त्याला शाळा प्रशासन जबाबदार नसल्याचे संमतीपत्र पालकांकडून लिहून घेतले जात आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कोविडची बाधा झाल्यास शाळा प्रशासन हात झटकण्यास मोकळे असणार आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट