भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन
पनवेल (प्रतिनिधी)उलवे परिसरामध्ये विकासाची कामे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत गव्हाण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार निकीता खारकर, गव्हाण पंचायत समितीच्या उमेदवार जिज्ञासा कोळी आणि वहाळ पंचायत समितीचे उमेदवार वितेश म्हात्रे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे येथे जाहिर पक्ष प्रवेशावेळी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उलवे शहराचे माजी अध्यक्ष आर्यन ठाकूर यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी भाजप परिवारात स्वागत केले.
भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे आणि कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा भाजपमधील ओघ सातत्याने वाढत आहे. त्यानुसार अगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उलवे शहर माजी अध्यक्ष आर्यन ठाकूर यांच्यासह दिनेश पाल, निलेश पाटील, संदीप सिंग, यशसिंग, सूरज सिंग, जय पवार, अंकित कुमार, पूजा मिश्रा, राणी जाधव, आरती सिंग, प्रिया सरोज, निकिता मौर्या, सागर वाघवारे, आशिष मिश्रा, अखिलेश झा, पवन परदेशी, मिथिलेश मिश्रा, अमित पाटील, रमेश चेतियार, योगेश सुळे, सुमीत बागडे, विशाल आहेर, मेहुल आयर, पूजा मिश्रा, राणी जाधव, आरती सिंग, प्रिया सरोज, निकिता मौर्या, अमित सिंग यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला आहे. उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठनेते जे एम म्हात्रे, भाजपनेते रवी पाटील, उमेदवार निकीता खारकर, वितेश म्हात्रे, जिज्ञासा कोळी, राहुल घरत यांच्यासह पदधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
With an MBA in Marketing (First Class with Distinction) and a deep passion for business strategy and innovation, I aim to bring new ideas to life through clarity, creativity, and strong leadership. As the Director of The Global Times, I focus on driving growth, building meaningful collaborations, and creating opportunities that make an impact. My vision is to take our brand to global heights — through digital innovation, smart planning, and ethical business practices. I’m constantly learning, evolving, and planning to pursue my PhD further — because growth never stops.
Krutika Tushar KhanvilkarDedicated to empowering teams, inspiring people, and setting new standards of excellence in the industry.