न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी ..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

कृणाल पांड्याला कोरोना ; दुसरा टी 20 सामना स्थगित

कोलंबो : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाली आहे. कृणालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याचा थेट परिणाम हा श्रीलंका विरुद्धच्या दुसर्‍या टी 20 सामन्यावर झाला आहे. कृणाल पॉझिटिव्ह असल्याने ही दुसरी मॅच स्थगित करण्यात आली आहे. 

कृणालला कोरोना झाल्याने टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. टीम इंडियाच्या मुख्य संघ इंग्लंड दौर्‍यावर आहे. या दौर्‍यात टीम इंडियाचे तीन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्यांना या कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे. दुखापतीमुळे शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना मुकावे लागले. त्यामुळे यांच्या जागी मुंबईकर सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांची इंग्लंड दौर्‍यासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र आता कृणालला कोरोना झाल्याने या दोघांच्या इंग्लंड दौर्‍याबाबत सांशकता निर्माण झाली आहे.

कृणालला कोरोना झाल्याने टीम इंडिया आणि श्रीलंकेच्या खेळाडूंना आयसोलेट करण्यात आलेय. या उभयसंघातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली जाणार आहे. सर्व खेळाडूंची टेस्ट नेगिटव्ह आली, तर हा स्थगित केलेला दुसरा सामना बुधवारी 28 जुलैला खेळवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

  • मालिकेत 1-0 ने आघाडीवर
    टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना जिंकून भारताला टी 20 मालिकाही जिंकण्याची संधी आहे. तर श्रीलंकेला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा दुसरा सामना महत्वाचा असणार आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट