पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या!
पनवेल,दि.08 : केंद्र शासनाने देशभरात नैसर्गिक गॅस पुरवठा वाढविण्यावर भर दिला आहे. केंद्र शासनानच्या सूचनेनूसार एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने ज्या भागात नैसर्गिक गॅस पाईपलाईन उपलब्ध आहे, तेथे एलपीजी ऐवजी पीएनजी (पाईपद्वारे नैसर्गिक वायू) वापरास प्रोत्सहन देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आयुक्त मंगेश चितळे यांनी नागरिकांनी पीएनजी गॅस पाईपलाईन कनेक्शन घेण्याचे आवाहन केले आहे.
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नियोजनबद्ध धोरणांमुळे व पायाभूत सुविधांच्या सक्षम उभारणीमुळे शहरात नैसर्गिक वायू वितरण व्यवस्थेला गती मिळाली असून, महानगर गॅस लिमिटेड (MGL) कडून अखंड PNG (पाईपद्वारे नैसर्गिक वायू) व CNG (संकुचित नैसर्गिक वायू) पुरवठ्याची हमी देण्यात आली आहे. याबाबत पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील गृहनिर्माण सोसायटींच्या अध्यक्ष व सचिव यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्यामार्फत प्रभाग निहाय पीएनजी पाईपलाईन नोंदणी कॅम्प लावण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या ९ मार्च २०२६ रोजीच्या नैसर्गिक वायू (पुरवठा नियमन) आदेश, २०२६ नुसार घरगुती PNG व CNG यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून सातत्याने पुरवठा कायम राखण्यासाठी कायम राखण्यासाठी उपयाययोजना राबविल्या आहेत. ज्यामुळे ग्राहकांना दैनंदिन वापरासाठी विश्वसनीय आणि सुरक्षित इंधन मिळणार आहे. या निर्णयाचा थेट लाभ पनवेल शहरातील नागरिकांना मिळणार आहे. पनवेल महानगरपालिकेने शहरातील आवश्यक परवानग्या, समन्वय व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे हा उपक्रम प्रभावीपणे राबविणे शक्य झाले आहे.
ग्राहकांसाठी विशेष लाभ योजना MGL मार्फत ग्राहक-केंद्रित विविध योजना राबविण्यात येत असून, त्याचा लाभ पनवेलमधील नागरिकांना मिळणार आहे.
घरगुती ग्राहकांसाठी आकर्षक योजना
1.१६ मार्च ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान नवीन नोंदणी करणाऱ्यांना ₹५०० किमतीचा मोफत गॅस
2.नोंदणीवेळी कोणतेही आगाऊ शुल्क नाही
3.मीटर बसविल्यानंतर पहिल्या बिलात शुल्क आकारणी
4.हप्त्यांमध्ये पेमेंट करण्याची सुविधा
व्यावसायिक ग्राहकांसाठी आकर्षक योजना
1.नोंदणी शुल्क पूर्णतः माफ
2.आवश्यक पायाभूत सुविधा कंपनीकडून उभारली जाणार
3.पनवेल महानगरपालिका नागरिकांना आवाहन करते की, पर्यावरणपूरक व सुरक्षित इंधन म्हणून PNG चा जास्तीत जास्त वापर करावा व या योजनांचा लाभ घ्यावा.
फसवणूक टाळण्यासाठी सूचना
-अज्ञात लिंकवर क्लिक करू नये
-APK फाईल डाउनलोड करू नये
-OTP किंवा बँक संबंधित माहिती कोणाशीही शेअर करू नये
-केवळ MGL च्या अधिकृत WhatsApp क्रमांकावरच (निळा टिक चिन्हासह) विश्वास ठेवावा.
नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
1) रहिवासी पुरावा (कोणताही एक)
2)वीज बिल
3)इंडेक्स २ ची प्रत
4)पासपोर्ट
5) ओळखपत्र (कोणताही एक)
आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / वाहन चालविण्याचा परवाना
6) ईमेल आयडी
7) पर्यायी मोबाईल नंबर
चौकट
आपल्या सोसायटीसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सोयीस्कर गॅस पाईप लाईन सुविधा मिळवण्यासाठी व सोसायटीमध्ये कॅम्प लावण्यासाठी या अधिकृत प्रतिनीधींशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महानगर गॅस कंपनीकडून प्राप्त माहितीनुसार महानगर गॅसचे संपर्कासाठीचे अधिकृत प्रतिनिधी
प्रभाग – अ : खारघर शहर
1.विनायक म्हमाणे – 9967544387
2.महेश थोरात – 9594391189
3.रवी सोनावणे – 8451089777
4.सचिन गोरे – 9029821713
5.मोहमद अकील - 7678076370
प्रभाग – ब : कळंबोली शहर
1.ऋषिकेश भोईर – 7718078533
प्रभाग – क : कामोठे शहर
1.संतोष जाधव – 8828989972
2.राज – 8600520728
प्रभाग – ड : पनवेल / कारंजाडे शहर
पनवेल शहर
1.अमित पवार – 9867814249
2.सुरज म्हात्रे – 7021933014
नवीन पनवेल शहर
1.राजरत्न भोसले – 9702880743
खांदा कॉलनी
1.प्रदीप शेंडकर – 9699914149
कारंजाडे शहर
1.आकाश देशमुख – 7506462847
2.सुरज म्हात्रे – 7021933014
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
With an MBA in Marketing (First Class with Distinction) and a deep passion for business strategy and innovation, I aim to bring new ideas to life through clarity, creativity, and strong leadership. As the Director of The Global Times, I focus on driving growth, building meaningful collaborations, and creating opportunities that make an impact. My vision is to take our brand to global heights — through digital innovation, smart planning, and ethical business practices. I’m constantly learning, evolving, and planning to pursue my PhD further — because growth never stops.
Krutika Tushar KhanvilkarDedicated to empowering teams, inspiring people, and setting new standards of excellence in the industry.