पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटनाकडे
- by
- May 05, 2026
उन्हाळी पर्यटनाचा हंगाम सुरु,जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बहरली, महागाईचा चटका असूनही पर्यटकांचा ओघ कायम
पाली : जैवविविधतेने नटलेले विलोभनीय निसर्ग सौंदर्य व विस्तीर्ण समुद्र किनारा तसेच ऐतिहासिक व धार्मिकस्थळे यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्याकडे वळतात. नुकत्याच उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामधील पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. कमर्शियल सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे खाण्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे त्याचा भुर्दंड ग्राहकांना बसत आहे.
समुद्रकिनारे फुल्ल
अलिबाग- नागाव, वरसोली, मुरुड- काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. हे सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. घोडागाडी, एटीव्ही राईड्स, घोडा व उंट सफारी पर्यटक याचा आनंद घेत आहेत.
'ऍग्रो टुरिझम' आणि फार्म हाऊसची क्रेझ
शहरी पर्यटकांना ग्रामीण भागातील रिसॉर्ट, फार्म हाऊस आणि ऍग्रो टुरिझमचे मोठे आकर्षण आहे. निसर्गरम्य वातावरणात शुद्ध हवा आणि चुलीवरच्या सात्विक जेवणाचा आनंद पर्यटक घेत आहेत. मोबाईल नेटवर्कपासून दूर राहून 'रिफ्रेश' होण्याकडे पर्यटकांचा कल असून, स्विमिंग पूल असलेल्या रिसॉर्ट्सना अधिक मागणी आहे. ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि टेंटमधील वास्तव्याचा अनुभव युवा वर्गासाठी खास आकर्षण ठरत आहे.
वाहतूक कोंडीचा ताप
मोठ्या प्रमाणावर पर्यटक व चाकरमानी रायगडमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग, पुणे बेंगलोर हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस वे व अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण आला असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी या वाहतूक कोंडीचा ताप पर्यटक व प्रवाशांना होताना दिसत आहे.
उन्हाळी हंगामामुळे पर्यटकांची संख्या अचानक वाढली आहे. सुरुवातीला व्यावसायिक गॅसच्या टंचाईचा काहीसा परिणाम झाला होता, मात्र आता परिस्थिती सुरळीत आहे. होमस्टेमध्ये पर्यटकांना चुलीवरचे जेवण अधिक आवडते. किमतीत थोडी वाढ झाली असली, तरी पर्यटकांचे बुकिंग कायम असून समुद्रकिनारे फुल्ल आहेत. पर्यटक समुद्र किनारी राहणे व मज्जा करणे पसंत करतात.
--सिद्धेश कोसबे, व्यावसायिक, दिवेआगर
व्यावसायिक सिलिंडरचे भाव वाढल्याने नाईलाजास्तव खाद्यपदार्थांच्या किमतीत थोडी वाढ करावी लागली आहे. तरीही पर्यटकांचा ओघ कमी झालेला नाही. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला उत्तम सोयी-सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
--अजित औकीरकर, व्यावसायिक, हिरकणीवाडी-रायगड
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटक व भाविक अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. आलेले भाविक आवर्जून त्यांना काही खरेदी करतात. त्यामुळे व्यवसाय देखील चांगला होत आहे. उन्हाळी सुट्ट्या संपेपर्यंत भाविकांचा ओघ कायम राहील.
--राहुल मराठे, व्यवसायिक, बल्लाळेश्वर मंदिर, पाली
व्यावसायिक गॅस सिलिंडरची कमतरता, वाढते दर आणि महागाईमुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. खर्च वाढल्याने नाईलाजास्तव आम्हाला खाद्यपदार्थांच्या दरात २० ते ३० टक्के वाढ करावी लागली आहे. सध्या गर्दी अधिक असल्याने पर्यटकांना दर्जेदार आणि वेळेत सेवा देण्यासाठी आम्ही 'लिमिटेड मेनू'वर भर देत आहोत. भाव वाढले असले तरी पर्यटकांचा प्रतिसाद चांगला आहे.
--गणेश सावंत, व्यावसायिक, दिवेआगर
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Sanket Jadhav