न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी ..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

उत्कृष्ट फलंदाज ठरला कस्तुरबा हॉस्पिटलचा रोहन जाधव

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शिवनेर व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती आंतर हॉस्पिटल बी डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार रोहन जाधवने पटकाविला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरणाऱ्या रोहन जाधवने कस्तुरबा हॉस्पिटलची मधली फळी भक्कम करणारी आक्रमक फलंदाजी केली. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्यासाठी तत्पर असलेली रोहन जाधवची फलंदाजी स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांना आव्हानच ठरले.


   अंतिम सामन्यात ग्लोबल हॉस्पिटलचे मर्यादित २० षटकात ८७ धावांचे विजयी लक्ष्य स्पर्धेमधील सर्व सामन्यात धावांचे शतक गाठणाऱ्या कस्तुरबा हॉस्पिटल संघाला सोपे होते. परंतु जलद धावा करण्याच्या नादात त्यांचा निम्मा संघ अवघ्या १६ धावांत तंबूत परतला. तेव्हा रोहन जाधवने कस्तुरबा हॉस्पिटलचा किल्ला एकाकी लढल्याचे शिवाजी पार्क मैदानात पाहण्यास मिळाले. रोहनने ४ चौकारांची आतषबाजी करीत प्रत्येक चेंडूवर धाव घेत कस्तुरबा हॉस्पिटलचा धावफलक सतत हलता ठेवला होता. सोळाव्या षटकाला विजया समीप धावसंख्या येत असतांना चौकार मारण्याच्या नादात रोहन जाधव (१९ चेंडूत ३७ धावा)  झेलचित झाला आणि कस्तुरबा हॉस्पिटल संघाला केवळ ५ धावांच्या फरकाने विजेतेपदास मुकावे लागले.


    आक्रमक फलंदाज अष्टपैलू चेतन सुर्वे, संदीप पाटील, नितेश म्हस्के, सचिंद्र ठाकूर आदी खेळाडूंच्या बलाढ्य रहेजा हॉस्पिटलचे आव्हान संपुष्टात आणतांना रोहन जाधवची संयमी फलंदाजी उपयुक्त ठरली. त्या सामन्यामधील कस्तुरबा हॉस्पिटलचे अष्टपैलू डॉ. परमेश्वर मुंडे, अष्टपैलू रोहन ख्रिस्तियन, अष्टपैलू अंकुश जाधव, भूषण तांबे यांचा खेळ देखील उत्तम होता

बी डिव्हिजन स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार रोहन जाधवला मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे. माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, आरएमएमएसचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट