Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw
- Feb 05, 2026
- 42 views
पत्रकारी कारकिर्दीमध्ये आपले नाव गाजवणारे जेष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे वयाच्या ६७ वर्षी दिल्लीला निधन झाले आहे. दिल्लीतील अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते. त्यांना २९ नोव्हेंबर रोजी तब्येत बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विनोद दुआ यांची मुलगी अभिनेत्री मल्लिका दुआ हिने ३० नोव्हेंबर रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची बातमी सगळ्या दिली आहे.
मल्लिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. २००८ मध्ये विनोद दुआ यांना पत्रकारितेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याच सोबत १९९६ मध्ये विनोद यांना रामनाथ गोयंका पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times