पीएम मोदी म्हणाले, न्यूझीलंडविरुद्धच्या शानदार विजयाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन! हा एक उत्कृष्ट सांघिक प्रयत्न होता जिथे प्रत्येकाने योगदान दिले. मैदानावरील समर्पण आणि कौशल्य अनुकरणीय होते.
शुभमनच्या नावावर नवा विक्रम
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील
भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना धर्मशालाच्या मैदानावर खेळवण्यात येत
आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
यानंतर फलंदाजीसाठी उतरेलल्या न्यूझीलंडने भारतासमोर २७४ धावांचे आव्हान
ठेवले आहे. दरम्यान, न्यूझीलंडच्या २७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना
शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण केल्या आहेत.
शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ३८ डावात २ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशीम आमला याच्या नावावर होता. त्याने २ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ४० डावात ही कामगिरी केली हाेती.
शमीचा धमाका
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील
भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना धर्मशालाच्या मैदानावर खेळवण्यात येत
आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
यानंतर फलंदाजीसाठी उतरेलल्या न्यूझीलंडने भारतासमोर २७४ धावांचे आव्हान
ठेवले आहे. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने शतकी खेळी केली. दरम्यान, भारताचा
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने दिग्गज माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचा
विक्रम मोडला आहे.
२०२३ च्या विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात मोहम्मद शमीने दमदार पुनरागमन केले आहे. त्याने १० षटकांमध्ये ४५ धावा देत ५ विकेट्स पटकावल्या आहेत. शमी विश्वचषकात भारतासाठी तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. अनिल कुंबळे यांनी विश्वचषक स्पर्धेत ३१ बळी घेतले आहेत. मोहम्मद शमीच्या नावावर विश्वचषक स्पर्धेत ३६ बळींची नोंद झाली आहे. शमीने विश्वचषक स्पर्धेत १२ सामने खेळत ३६ विकेट्स पटकावल्या आहेत.
विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत जहीर खान आणि जवागर श्रीनाथ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी विश्वचषकात प्रत्येकी ४४ विकेट्स पटकावल्या आहेत. या यादीत मोहम्मद शमी ३६ विकेट्स पटकावत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे.
झहीर खान – ४४ विकेट्स
जवागल श्रीनाथ – ४४ विकेट्स
मोहम्मद शमी – ३६ विकेट्स
अनिल कुंबळे – ३१ विकेट्स
'तो' पराभव धोनीच्या जिव्हारी लागला : माजी प्रशिक्षकाचा खुलासा
यंदाच्या वन-डे विश्वचषक स्पर्धेत
टीम इंडियाचे दमदार प्रदर्शन सुरु आहे. भारताने या स्पर्धेतील सलग चार
सामने जिंकले आहेत. मात्र गत विश्वचषक स्पर्धेत भारताचा प्रवास उपांत्य
फेरीतच संपुष्टात आला होता. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात माजी
कर्णधार महेंद्रसिंग धोनी धावबाद होताच टीम इंडियाच्या
विजयाच्या आशा संपुष्टात आल्या हाेत्या. त्या विश्वचषकादरम्यान भारतीय
संघाचे फलंदाजी प्रशिक्षक असलेले संजय बांगर यांनी या
सामन्यानंतर झालेल्या घटनेचा मोठा खुलासा केला आहे. रविवारी (२२ ऑक्टोबर)
भारत-न्यूझीलंड सामन्यावेळी त्यांना या घटनेचे स्मरण झाले. (World Cup
2019 IND vs NZ)
धोनीसोबत हार्दिक आणि ऋषभलाही अश्रू अनावर
मागील विश्वचषक स्पर्धेत ११ जुलै २०१९ रोजी उपांत्य फेरीत न्यूझीलंड आणि भारत आमने-सामने होते. या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी धावबाद होताच टीम इंडियाच्या आशा संपुष्टात आल्या. या सामन्याबाबत बोलताना बांगर म्हणाले की, गत विश्वचषकातील उपांत्य फेरीत पराभव लागला धोनीच्या जिव्हारी लागला. ड्रेसिंग रूममध्ये तो धाय मोकलून रडाला. धोनी बराच वेळ रडत राहिाला. धोनीसोबत हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतही रडत होते.
तो सामना धोनीच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला
“उपांत्य फेरीतील पराभवानंतर धोनीचे अश्रू थांबत नव्हते. पंत आणि हार्दिकही ड्रेसिंग रूममध्ये ढसाढसा रडत होते. तो सामना धोनीच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. यानंतर धोनीने भारतीय संघाची जर्सी घातली नाही, असे बांगर म्हणाले.
World Cup 2019 IND vs NZ : उपांत्य सामन्यात काय घडलं हाेतं?
इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 50
षटकांत आठ गडी गमावून 239 धावा केल्या. पावसामुळे हा सामना दोन दिवसात
पूर्ण झाला. खराब हवामान आणि पावसामुळे परिस्थिती वेगवान गोलंदाजांना
अनुकूल होती. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी याचा फायदा घेत भारताच्या सहा
विकेट्स 92 धावांपर्यंत कमी केल्या. भारत मोठ्या पराभवाच्या जवळ होता.
येथून धोनीने रवींद्र जडेजाच्या साथीने डावाला आकार दिला. धोनी आणि जडेजा
यांनी सातव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली होती. संघाच्या 208
धावांवर जडेजा बाद झाला. त्यानंतर 49व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धोनी
धावबाद झाला आणि टीम इंडियाच्या आशा संपुष्टात आल्या. महेंद्रसिंह धोनी
याने अर्धशतकी खेळी केली. भारतीय संघाचा डाव 49.3 षटकात 221 धावांवर
संपुष्टात आला होता. पॅव्हेलियनमध्ये परताना धोनी रडत होता. तो आपले अश्रू
लपवण्याचा प्रयत्न करत होता, पण ते शक्य होत नव्हते. या वेदनादायी घटनेचे
स्मरण आज बांगर यांनी करुन दिली.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times