Breaking News
मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३: गोदरेज यमीज या गोदरेज टायसन फूड्स लिमिटेड (जीटीएफएल)च्या
फ्रोजन रेडी टू कूक उत्पादनांच्या आघाडीच्या
ब्रँडने सॅशे स्वरूप आणून फ्रोजन फूड्सच्या श्रेणीत खळबळ निर्माण केली आहे. या श्रेणीतील पहिले पाऊल
म्हणून यमीजने दोन चिकन सॉसेजचा प्रथिनांनी समृद्ध पॅक फक्त ३० रूपये इतक्या
परवडणाऱ्या दरात आणला आहे. सॅशे स्वरूपातील हे दोन सॉसेज तुम्हाला एकूण ७ ग्रॅम
प्रथिने देतात. या सॉसेजसारख्या फ्रोजन फूड्सचे सॅशेकरण केल्यामुळे फ्रोजन फूड्स
सर्वांसाठी स्वस्त आणि सहजसाध्य होतील. त्यामुळे फक्त महानगरांमध्येच नाही तर टायर
२ शहरे आणि निमशहरी भागांमध्येही फ्रोजन फूड्सचा वापर वाढेल अशी अपेक्षा आहे.
भारतातील फ्रोजन फूड्सच्या क्षेत्रात ५ टक्क्यांपेक्षा कमी
व्याप्ती आहे. त्यामुळे विस्ताराला भरपूर संधी आहे. पारंपरिकदृष्ट्या शाकाहारी आणि
मांसाहारी अशा दोन्ही फ्रोजन फूड्सची किंमत १७० आणि ३०० रूपयांमध्ये ठेवण्यात आली
आहे. या श्रेणीतील वाढीला चालना देण्यासाठी आणि विविध शहरे व लोकांमध्ये जास्तीत
जास्त
लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही उत्पादने अधिक वाजवी दरांत
उपलब्ध करून देणे आणि सहजसाध्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
चिकन सॉसेज हे प्रामुख्याने प्रथिनांनी समृद्ध असल्याचे
मानले जाते. त्याशिवाय, सॉसेजसारख्या कोल्ड कट्सना वाढती मागणी आहे, कारण प्रवासातील अनुभव आणि
प्रथिनांनी समृद्ध, कमीत-कमी शिजवलेल्या अन्नाला प्राधान्य दिले जाते. हीच बाब
महानगरांपलीकडे म्हणजे टायर २ आणि बिगर राजधानी शहरांमध्येही दिसून येते. ही गरज
लक्षात घेऊन यमीजने या क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून फक्त ३० रूपयांच्या
नावीन्यपूर्ण मिनी पॅकमध्ये उत्तम दर्जाचे यमीज चिकन सॉसेज आणले आहेत. तुमचे सकाळचे
ऑम्लेट असो वा आवडचा रॅप, पिझ्झा टॉपिंग किंवा ग्रीन सॅलड असो. सॉसेज हे एक
वैविध्यपूर्ण वापरासाठीचे उत्पादन आहे आणि दिवसातल्या कोणत्याही वेळेच्या प्रत्येक जेवणासोबतची
उत्तम जोड आहे.
या अनावरणाबाबत बोलताना गोदरेज टायसन फूड्स लिमिटेडचे मुख्य
कार्यकारी अधिकारी (सीईओ) अभय पारनेरकर म्हणाले
की, "भारताच्या विश्वासू फ्रोजन फूड्स ब्रँडसपैकी एक म्हणून
गोदरेज यमीजने फ्रोजन फूड्सच्या क्षेत्रात सॅशे आणले आहेत. त्यामुळे ते
प्रत्येकासाठी सहजसाध्य ठरले आहेत. फ्रोजन फूड्सचा वापर येतो तेव्हा ग्राहकांसाठी
किंमत एक मोठा अडथळा ठरतो. त्यामुळे आम्ही खरेदीची किंमत ८० टक्क्यांनी कमी करून
चिकन सॉसेज फक्त ३० रूपयांत आणले आहेत. यामुळे व्यक्तींना आपल्या खरेदीच्या
प्राधान्यानुसार तसेच मूडनुसार फ्रोजन फूड खरेदी करणे शक्य होते आणि भरपूर
प्रमाणात साठवण्याची किंवा फ्रीज करण्याची गरजदेखील उरत नाही.”
ते पुढे म्हणाले की, “आमचे नवीन चिकन सॉसेज किंमतीबाबत जागरूक ग्राहकांसाठी उत्तम
आहेत. ते बदलत्या टियर २ बाजारपेठांसाठीही एक उत्तम पर्याय ठरतात. हे उत्पादन
घरांपासून ते बाहेरच्या ठिकाणी राहणारे विद्यार्थी, बॅचलर्स अशा प्रत्येकासाठी
सुसंगत आहे. पीव्हीआर आयनॉक्ससोबतच्या आमच्या धोरणात्मक भागीदारीमुळे या नवीन
स्वरूपाबाबत जागरूकता निर्माण होईल आणि एका वैविध्यपूर्ण ग्राहकांपर्यंत आम्हाला
पोहोचता येईल.”
विविध प्रदेशांतील ग्राहकांपर्यंत हे नावीन्यपूर्ण स्वरूप
पोहोचवण्यासाठी गोदरेज यमीजने भारतातील सर्वांत मोठ्या मल्टीप्लेक्सची साखळी
असलेल्या पीव्हीआर आयनॉक्ससोबत भागीदारी केली आहे. गोदरेज यमीज पीव्हीआर
आयनॉक्ससोबत कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद येथे जागरूकता उपक्रम चालवत आहे, तर नवीन स्वरूपाबाबतचे ६०
सेकंदांचे संदेश ५३ निवडक पडद्यांवर दाखवले जातील.
गोदरेज यमीज चिकन सॉसेज पॅक फक्त ३० रूपये किंमतीत उपलब्ध करून देऊन
भारतातील वेगवान आणि सुलभ खाद्यपदार्थांच्या निवडीच्या क्षेत्रात मोठी क्रांती
घडवून आणली जात आहे. या ब्रँडची वचनबद्धता स्पष्ट आहेः अत्यंत चविष्ट, उत्तम
दर्जाचे फ्रोजन फूड सर्वांसाठी उपलब्ध करणे, किफायतशीरपणाबाबत तडजोड न करता उत्तम दर्जा देणे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times