सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

23 हजार 628 पोलिसांची भरती होणार

23 हजार 628 पोलिसांची भरती होणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती

नागपूर : राज्यात लवकरच 23 हजार 628 पोलीस शिपयांची पदभरती (Maharashtra Police Recruitment) होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषद लक्षेवेधीवेळी दिली. गृह विभागातील पोलीस शिपाई भरती (Maharashtra Police Bharti) तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात 23 हजारांपेक्षा जास्त पोलिसांची लवकरच भरती होणार असल्याचे सांगितले. या लक्षवेधी सूचनेच्या वेळी भाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला.

गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्यनुसार किती अंतरावर पोलिस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 8 हजार 400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार निराश झाले होते. यासंदर्भात गृह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

पोलीस शिपायाची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यामध्ये सोशल मीडिया साईट,गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सीसीटीव्हीसंदर्भात नियमावली तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार लोकांना प्रशिक्षित करून त्याचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट