गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

खबरदारी घ्या, विद्युत अपघात टाळा!

कोणत्याही मूलभूत गरजेइतकीच वीजही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. जीवन सुखकर बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्याला विजेचा फायदा होऊ शकतो, त्याचप्रमाणे ती वापरताना योग्य काळजी घेतली नाही, तर विद्युत अपघात घडून नुकसान होऊ शकते. सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळले तर हे अपघात टाळता येतात. महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त...


शॉर्टसर्किटपासून होणारे अपघात असोत की, वीज हाताळताना होणारे अपघात, हे खबरदारी न घेतल्यामुळेच होतात. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत विद्युत अपघाताच्या घटना पाहता आता अधिक जागरूकतेने व सुरक्षितपणे विजेचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे. याकरिता प्रभावी जनजागृतीची आवश्यकता आहे.


चुकीला माफी नाही: 'वीज' ही अशी बाब आहे, ही डोळ्याने दिसत नाही परंतु ती वापरताना काळजी घेतली नाही तर होणारे परिणाम टाळता येत नाहीत. वीज हाताळताना चुकीला माफी नाही. त्यामुळे वीज उपकरणे हाताळताना काय काळजी घ्यावी, याचा प्रत्येकानेच गांभीर्याने विचार करावा.  


दर्जेदार उपकरणांचा वापर:घर, उद्योग,कार्यालय अथवा शेती असो, वीज वापरताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. वीजपुरवठा घेताना किंवा वेळोवेळी विद्युत केबल, स्विचेस अथवा इतर उपकरणे ही 'आयएसआय' प्रमाणित असल्याचे व योग्य क्षमतेचे असल्याची खात्री करावी. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नये. प्रमाणित ठेकेदारांकडूनच विद्युतीकरणाची कामे करुन घ्यावीत. वायरिंगसाठी योग्य क्षमतेचे एमसीबी (मिनिएचर सर्किट ब्रेकर) वापरावेत, जेणेकरून अतिभार किंवा शॉर्टसर्किटमुळे धोका निर्माण होणार नाही. गुणवत्ता नियंत्रण मंडळाने प्रमाणित केलेली विद्युत उपकरणेच वापरावीत. उदा. मिक्सर, पाण्याचे हीटर, टोस्टर, ग्राईंडर, फ्रीज, वॉशिंग मशीन इत्यादी.


योग्य अर्थिंग: वीज वापरामध्ये अर्थिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अनेक अपघात हे योग्य प्रकाराची अर्थिंग न केल्यामुळे घडल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे वायरिंग इन्स्टॉलेशनसाठी कॉपर प्लेट किंवा कॉपर रॉडची अर्थिंग कार्यक्षमपणे घेणे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे.


इन्सुलेटेड वायरचा उपयोग: अर्थ लीकेजपासून होणारा धोका टाळण्यासाठी ईएलसीबी (अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर) वापरावे. मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये २० ते ५० मीटरची स्वतंत्र मीटर रूम असते. बऱ्याच वेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मीटर रूम स्वच्छ, प्रकाशित व हवेशीर असली पाहिजे. पावसाळ्यात मीटर रूममध्ये पाणी जाणार नाही; त्याचबरोबर भिंती ओल्या होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मीटर रूमचा वापर स्टोअर रूम म्हणून करू नये. मीटर रूममध्ये उंदरांचा वावर होणार नाही, याकडेही लक्ष दिले पाहिजे. तेथे ज्वालाग्राही पदार्थ ठेवणे टाळावे. न्युट्रल वायरसाठी उघड्या वायरचा वापर न करता इन्सुलेटेड वायरचाच वापर करा. एका सर्किटमध्ये मल्टी प्लग/तारा घालू नका. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आगीस निमंत्रण मिळते.


मेन स्विचचा वापर: शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यास प्रथम मेन स्विच बंद करा. विद्युतरोधक अग्निशमनचा वापर करा. पाण्याचा वापर करू नका. प्लग, पिन, बटण, बोर्ड यांना तडे गेल्यास ती त्वरित बदलावीत. पंखे, इस्त्री, कूलर वापरताना त्यात वीजप्रवाह उतरू शकतो. याची जाणीव ठेवूनच सावधानतेने ती हाताळावीत.    


आयुष्याचे मोल जाणा:विजेविषयी अज्ञान असणे, ही गोष्ट जितकी भयानक आहे, त्याहीपेक्षा ज्ञान असूनही निष्काळजीपणा, फाजील आत्मविश्वास हे अधिक भयंकर आहे. अतिउत्साहात अगदी निष्णात लोकदेखील हातात रबरी ग्लोव्हज घालणे, पायात सेफ्टी बूट वापरणे तसेच वीजपुरवठा बंद करून मग काम करणे, अशा छोट्याछोट्या बाबींकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. रात्रंदिवस विजेच्या क्षेत्रात काम करणारे कामगार, जनमित्र, वायरमन यांनी आपले जीवनमूल्य जाणून घेऊन आपल्यावर आपल्या कुटुंबाचीही जबाबदारी असल्याचे भान ठेवूनच विद्युतीकरणाचे काम करावे. सुरक्षेचे उपाय हे केवळ आपल्यासाठी नसून आपल्याशी निगडित प्रत्येक घटकासाठी तितकेच महत्वाचे आहेत, याची जाणीव सातत्याने ठेवणे महत्वाचे आहे


दैनंदिन वीज वापरातील महत्वाच्या बाबी: विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका. वीजवाहिनीच्या खाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका. विद्युत खांब किंवा खांबांचा ताण यांना गुरे-ढोरे बांधू नका. विद्युतप्रवाह सोडू नका. तात्पुरते लोंबकळणारे वायर वापरू नका. विजेचा अनधिकृत वापर टाळा. कुलरमध्ये पाणी टाकताना वीजपुरवठा बंद ठेवा. विजेच्या तारेखाली कापलेले पीक ठेवू नका. कपडे वाळवण्यासाठी वीज तारांचा वापर करू नका. विजेच्या तारा तुटून जमिनीवर पडल्या असतील तर त्यांना स्पर्श करू नका किंवा त्या ओलांडून जाण्याचा प्रयत्न करु नका व इतरांनाही तसे करू देऊ नका.


- विजयसिंह दुघभाते, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, कल्याण परिमंडल.

रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट