Breaking News
मनसे मध्यवर्ती कार्यालय नूतनीकरण आणि नेरुळ, सेक्टर-२० शाखा उदघाटन सोहळा संपन्न
गजानन काळे व सहकाऱ्यांनी अमितजी ठाकरेंचे केले जोरदार स्वागत
नवी मुंबई मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले. या नूतनीकरण सोहळ्याचे आयोजन तसेच मध्यवर्ती कार्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष श्री. गजानन काळे व त्यांचे सहकारी यांच्या तर्फे करण्यात आले होते. त्याचप्रमाणे नेरुळ सेक्टर - २० मध्ये मनसे उप शहर अध्यक्ष श्री. सविनय म्हात्रे व मनसे महिला सेना विभाग अध्यक्ष सौ. भूमिका सविनय म्हात्रे यांनी मनसेची शाखा सुरु करण्यात आली. या दोन्ही कार्यक्रमासाठी मनसे नेते व मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांनी उपस्थिती लावली. अमित जी ठाकरे येणार त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. अमित जी ठाकरे यांचे स्वागत सीवूड्स मधील मध्यवर्ती कार्यालय येथे ढोल ताशांच्या गजरात केले. मनसे विद्यार्थी सेनेतील कार्यकर्त्यांनी भला मोठा हार क्रेन ने घालून स्वागत केले. तसेच फटाक्याच्या आतषबाजीने सीवूड्स जगमगून गेला. "युवाहृदयसम्राट अमित ठाकरे साहेबांचा विजय असो", "अमित ठाकरे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नेरुळ मधील शाखेच्या उदघाट्न प्रसंगी स्थानिक नेरुळ गावातील भूमिपुत्र तसेच कॉलनी मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेरुळ येथील गावदेवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले व नवी मुंबईच्या विकासासाठी मनसेच्या पारड्यात सत्तेचे दान टाकण्याचे साकडे घातले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या घेऊन उपस्थित होते. सिडको सोडतधारक, MPSC विद्यार्थी, बेरोजगार तरुण यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन अमितजी ठाकरे यांना दिले.
मनसेच्या शक्ती प्रदर्शनाने मनसे येत्या महानगरपालिका निवडणुकीत चमत्कार करेल अशी चर्चा नवी मुंबईकर करत आहेत. मनसेचे प्रत्येक कार्यालय हे जनतेचे न्यायालय आहे. येथे सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला जातो. "नवी मुंबईतील प्रत्येक मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक हा सर्वसामान्य नागरिकांना भेदसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. कोणतीही सत्ता नसताना मनसेने नवी मुंबईत जनहिताच्या प्रश्नांना नेहमीच वाचा फोडली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करून न्याय मिळवून दिला आहे." अशी प्रतिक्रिया मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, मनसे उप शहरअध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजीत देसाई, नितीन लष्कर, दिनेश पाटील, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, पालिका कामगार सेना शहर अध्यक्ष अप्पासाहेब कौठुळे, रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, शहर संघटक अनिकेत पाटील, रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष संदीप गलुगडे, महिला सेना उप शहरअध्यक्ष अनिथा नायडू, दिपाली ढवूळ, शुभांगी बंदिचोडे, सोनिया धानके, मनसे विभाग अध्यक्ष अनिकेत भोपी, विशाल गाडगे, प्रवीण राऊत, भूषण कोळी, अमोल आयवळे, अक्षय भोसले, योगेश शेटे, अभिलेश दंडवते, भूषण आगीवले, चंद्रकांत मंजुळकर, नितीन नाईक, विशाल चव्हाण, चंद्रकांत डांगे, रोहन पाटील, शाम ढमाले, नागेश लिंगायत यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिकांनी घेतली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
Suhas Kamble