महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या जनता दरबारा पासुन ठेवले लांब.
प्रतिनिधी रामचंद्र घोडमोडे श्रीवर्धन
श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचा दिनांक २०/६/२०२५ रोजी जनता दरबार मध्यवर्ती प्रशासकीय भवन श्रीवर्धन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील २२ प्रशासकीय अधिकारी यांना पत्रक सुद्धा काढण्यात आले होते. मात्र पत्रकारांना अधिकृत आमंत्रण देण्यात आले नव्हते. जनता दरबार मध्ये पत्रकारांना आमंत्रण मिळेल हे पत्रकारांना अपेक्षित होते. श्रीवर्धन तालुक्यातील अनेक समस्या पत्रकार नेहमी लेखणीतून मांडत असतात परंतु श्रीवर्धन प्रांत अधिकारी हे कधीही शासकीय कार्यक्रमाना पत्रकारांना आमंत्रण देत नाहीत.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना आमंत्रण दिले नसल्याने जनता दरबारा मधील नागरिकांच्या असलेल्या समस्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामांच्या दिरंगाईबाबत. कुठेही वाच्यता होऊ नये यासाठी तर हे सर्व केले नाही ना ? प्रांत अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकाम. आदगाव सर्वे इतर ठिकाणी चालू असलेले सी.आर.झेड. उल्लंघन. लाखोवारी खर्च करून सुद्धा शासकीय भवनाला लागलेली गळती. सेतू केंद्रा बाबतची समस्या. ठराविक व्यक्तींना हाताशी धरून करण्यात येणारी कामे ? . दिवेअगार. सर्वे येथील शासकीय जागेवर होणारे अतिक्रमण. गुरुचरण जागेवर झालेले अतिक्रमण. अराठी येथील कचरा प्रश्न. पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडील दगड खाणी मध्ये स्फोट घडवण्यासाठी नसलेले परवाने. तरीसुद्धा जोमात चालू असलेल्या दगडखाणी अशा अनेक तालुक्यातील समस्यांचा पाढा पत्रकार वाचण्याची भीती निर्माण झाली होती का ? याबाबत संशय व्यक्त होत आहे. प्रांत अधिकारी महेश पाटील यांची ही पहिलीच घटना नसून लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी सुद्धा काही पत्रकारांना डावलण्यात आले होते. महेश पाटील यांना पत्रकारांची नेहमीच ऍलर्जी असते. याचा श्रीवर्धन प्रांत अधिकारी महेश पाटील यांनी खुलासा करावा. श्रीवर्धन तालुक्यात अनेक पत्रकार आहेत काही फक्त बातम्या लिहितात तर काही फक्त कार्ड घेऊन फिरतात त्यांना जर का ते जवळ करत असतील तर त्यावर देखील पत्रकारांचा आक्षेप आहे.
अदिती तटकरे यांनी घेतलेला जनता दरबार खरोखरच चांगली गोष्ट आहे. परंतु या ठिकाणी जर का पत्रकारांना आमंत्रणच नसेल तर या दरबाराचा फायदा काय ? त्यांनी सुद्धा निवडणुकी पुरते फक्त पत्रकारांना जवळ न करता पत्रकारांन जवळ संपर्क ठेवणे गरजेचे आहे . जर का प्रशासकीय अधिकारीच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला बाजूला ठेवत असतील तर तालुक्यात काय कामाचे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
श्रीवर्धन मतदारसंघ हा खूप मोठा आहे यामध्ये श्रीवर्धन म्हसळा, तळा, माणगाव आणि रोह्याचा काही भाग जोडलेला आहे. परंतु अशा प्रकारे जनता दरबार होत असेल आणि त्या ठिकाणी शासकीय अधिकारी जर का पत्रकारांना आमंत्रण देत नसतील तर ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. पत्रकार प्रत्येक वेळी जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवतात परंतु शासकीय अधिकारी त्यावर कोणताही अभ्यास करत नाहीत. यापुढे अशी गोष्ट घडल्यास माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रीतसर तक्रार पत्रकार संघटने कडून केली जाणार आहे.
ReplyForward
Add reaction
रिपोर्टर
The Global Times (Admin)
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times