सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

*मनसेचा वाशी मध्ये जल्लोष..

हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतल्याचा आनंद फटाके फोडून, ढोल वाजवून, पेढे भरवून साजरा करण्यात आला*

मराठी माणसाच्या एकजुटी नंतर निघणाऱ्या मोर्चा चा धसका घेऊन राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय मागे घेतले. राजसाहेब ठाकरे यांनी या शासन निर्णया बाबत घेतलेली ठाम भूमिका निर्णायक ठरली. हे शासन निर्णय मागे घेणे हा मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी मोठा विजय आहे. हा विजय मनसेने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साजरा केला. मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या उपस्थितीत फटाके फोडून, ढोल वाजवून, एकमेकांना पेढे भरवून मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी जल्लोष साजरा केला. या जल्लोषात मराठी माणसांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला. ढोल ताशाच्या तालावर नाचून मनसे पदाधिकाऱ्यांनी आपला आनंद साजरा केला. तर महिलांनी फुगडी घालून आपला आनंद व्यक्त केला. गजानन काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना"झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना... माझ्या माय मराठीच्या चरणी", "दिल्ली चे ही तख्त झुकवितो महाराष्ट्र माझा" असे म्हणत हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचे म्हटले.

"मराठी भाषेचा विजय असो", "मराठी संस्कृतीचा विजय असो", "मराठी एकजुटीचा विजय असो" अशा घोषणा देऊन जल्लोष उत्सव साजरा करण्यात आला. हा जल्लोष मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, उप शहर अध्यक्ष अनिथा नायडू, दीपाली ढऊळ, सोनिया धानके, शहर सचिव यशोदा खेडसकर, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील, मनसे विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, भूषण कोळी, सागर विचारे, चंद्रकांत मंजुळकर, श्याम ढमाले, नितीन नाईक, योगेश शेटे, उमेश गायकवाड, विभाग सचिव संदेश खांबे, उप विभागअध्यक्ष, विनोद लांडगे, शाखाअध्यक्ष प्रणित डोंगरे, चेतन कराळे, शैलेश पांजगे, वाहतूक सेना चिटणीस विष्णू कांबळे, कृष्णा कांबळे, विद्यार्थी सेना शहर सह सचिव विपुल पाटील, मधुर कोळी, महिला विभाग अध्यक्ष संगीता वंजारी रागिणी खामकर, विदया इनामदार, शीतल दळवी, इतर मनसे पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक, स्थानिक मराठी माणूस यांनी मिळून साजरा केला.

रिपोर्टर

  • Suhas Kamble
    Suhas Kamble (sub editor)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Suhas Kamble

संबंधित पोस्ट