Breaking News
नवी मुंबईतील सर्व शाळांनी शालेय बस धोरणची अंमलबजावणी करावी... मनविसे
बस धोरणाची अंमलबजावणी तात्काळ करू... उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे मनविसेला आश्वासन
नवी मुंबईतील सीवूडस येथील डीपीएस शाळेत शिकणाऱ्या ४ वर्षाच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे नवी मुंबई शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे आता विद्यार्थ्यांसह पालक वर्गामध्ये सुद्धा भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य शासनाकडून स्कूल बस धोरण २०११ शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावली तयार करण्यात आलेली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या नियमावलीचे नवी मुंबई शहरातील खाजगी शाळांकडून काटेकोरपणे पालन केले जात नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे स्कूल बस धोरण २०११ शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीची नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये काटेकोरपणे तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी मनसे प्रवक्ते, मनविसे सरचिटणीस, मनसे शहर अध्यक्ष श्री. गजानन काळे यांच्या वतीने मनविसे शिष्टमंडळाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. दत्ता सांगोलकर यांना केली.
शाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने - आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबे निश्चित करणे, या बाबींकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये एक परिवहन समिती असावी. हि समिती वाहनाची कागदपत्रे, जसे - नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, पीयूसी, वाहनांची अनुज्ञाप्ती (वाहन परवाना), अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार सुविधा आणि या नियमांच्या परिशिष्ट २ मध्ये विनिर्दिष्ट केल्यानुसार सामायिक प्रमाणित करारपत्र (कंत्राट) इत्यादींची पडताळणी करेल. या समिती मध्ये नियमाप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक, पालक, शिक्षक संघाचे प्रतिनिधी, वाहतूक निरीक्षक, पोलीस निरीक्षक, शिक्षण अधिकारी यांचे प्रतिनिधी, बसच्या कंत्राटदाराचा प्रतिनिधी आणि स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी यांचा समितीत समावेश असावा. शाळेतील मुलांच्या सुरक्षे साठी शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार असतील. शाळेच्या "आत" येण्याच्या आणि "बाहेर" जाण्याच्या फाटकासमोर १०० मीटर परिसरात शाळेचे कंत्राटी वाहन असल्याचा परवाना नसलेली कोणतीही खाजगी वाहने, ऑटोरिक्षा आणि टॅक्सी थांबवण्यास परवानगी देऊ नये. प्रथमोपचार पेटी आणि आवश्यक ती औषधे व साधने वाहनांमध्ये ठेवावीत. यासह अनेक मागण्या मनसे शिष्टमंडळाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या समोर केल्या. तसेच सर्व मागण्या वर तात्काळ कार्यवाही न झाल्यास लवकरच मनसे स्टाईल आंदोलन होईल असा इशारा मनसेने दिला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. दत्ता सांगोलकर यांनी उदया पासून परिवहम खाते सर्व शाळांच्या बस ची तपासणी करेल आणि त्यावर योग्य कार्यवाही करेल असे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले. मनसेच्या या शिष्टमंडळात मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, मनसे उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, अनिकेत पाटील, मनविसे उप शहरअध्यक्ष प्रतीक खेडकर, सहसचिव मधुर कोळी, विपुल पाटील, नितीन काटेकर, मनसे शाखा अध्यक्ष चेतन कराळे, मनविसे उपविभागअध्यक्ष चिन्मय हमरुसकर, शुभम काळे व पदाधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble