Breaking News
https://www.youtube.com/watch?v=iydJ5Bf44qg
घणसोली मधील विविध नागरी प्रश्नांसाठी मनसेचा घणसोली विभाग कार्यालयावर भव्य "थाळीनाद मोर्चा"
नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवल्या नाही तर यापुढे उग्र आंदोलन होईल... गजानन काळे यांचा प्रशासनाला इशारा
घणसोली परिसर मोठ्या प्रमाणात नागरी समस्यांनी वेढला गेलेला आहे. मागील पाच वर्षांपासून प्रशासनाचा कारभार आहे. या काळात सगळीकडे आरोग्य, अपुरा व दूषित पाणी पुरवठा, खराब रस्ते-पदपथ, अनाधिकृत इमारती, घणसोली मधील प्रदूषित नाला अशा शेकडो समस्यांनी विभाग वेढलेला आहे. या समस्यांविरोधात मनसेने मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष श्री. गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली घणसोली विभाग कार्यालयावर भव्य "थाळीनाद मोर्चा" काढला. मोठ्या प्रमाणात समस्या असताना देखील झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना थाळ्या वाजवून महाराष्ट्र सैनिकांनी जागे करण्याचा प्रयत्न केला. शेकडो च्या संख्येने स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक , मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. घणसोली डी मार्ट ते घणसोली पोस्ट ऑफिस पासून दगडू चाहू पाटील चौकापासून घणसोली विभाग कार्यालय असा थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. "या अधिकाऱ्यांचे करायचे काय... खाली डोकं वर पाय", "पाणी आमच्या हक्काचे... नाही कोणाच्या बापाचे", "घणसोली स्थानक परिसर फेरीवाला मुक्त झालेच पाहिजे", "कंत्राटदार अधिकाऱ्यांचे लागे बांधे...नागरिकांचे रस्त्यावर चालण्याचे झाले वांदे", डांबर कमी खडी जास्त...रस्त्यावर खड्डे भरमसाठ", "मोठ्या नाल्याची होत नाही साफसफाई
अधिकारी मात्र मलाई खाई" अशा घोषणांनी महाराष्ट्र सैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
घणसोली मधील घनकचरा तुटलेल्या कचराकुंड्या आणि त्यामुळे रस्त्यावर पडलेला कचरा नागरिकांना होणारा त्रास याचे फोटो पुराव्यासह अधिकाऱ्यांना देण्यात आले , अतिक्रमणाचा विळखा घणसोलीला बसत असल्याचा गंभीर आरोप संदीप गलुगडे यांनी केला. घणसोली गावामधील कॉलनी परिसरात रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे मत नितीन नाईक यांनी मांडले, अपुरे आणि दूषित पाणी पुरवठ्या बद्दल पालिका अधिकाऱ्यांना रोहन पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले. घणसोली मध्ये झालेल्या उद्यानाच्या दुरवस्थेबाबत यावेळी पालिका प्रशासनाला जाद विचारण्यात आला तुटलेली खेळणी, तुटलेली आसन व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची गैरसोय याबाबत विशाल चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केले. घणसोली मधील सर्वात मोठ्या दूषित नाला व त्याच्या दुर्गंधी मुळे नागरिकांना सहन करावा लागणाऱ्या त्रासा बाबत संदीप गलुगडे यांनी महापालिकेला जाब विचारला. पुरेशी धूर फवारणी व काळजी न घेतल्यामुळे मलेरिया, डेंग्यू ने घणसोली मध्ये थैमान घातले असल्याचे महिला सेनेच्या सोनिया धानके यांनी सांगितले. अश्या बऱ्याच प्रश्नांची अधिकाऱ्यांकडे उत्तरे नसल्याचे दिसून आले. मनसेने उपस्थित केलेले सर्व प्रश्न जर अधिकाऱ्यांनी योग्य वेळेत सोडवले नाहीत तर यापुढे उग्र आंदोलन होईल असा इशारा याप्रसंगी गजानन काळे यांनी दिला.
मनसेच्या या शिष्टमंडळात मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर संघटक रस्ते आस्थापना संदीप गलुगडे, महिला सेनेच्या शहर अध्यक्षा आरती धुमाळ, उपशहर अध्यक्षा सोनिया ढाणके ,यशोदा खेडसकर, विभाग अध्यक्ष रोहन पाटील, नितीन नाईक, विशाल चव्हाण, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे ,शहर सचिव सचिन कदम, विलास घोणे, मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील, विभाग अध्यक्ष भूषण कोळी , योगेश शेटे , चंद्रकांत डांगे ,विभाग सचिव बालाजी लोंढे, महेश चव्हाण उपविभाग अध्यक्ष हरीश चव्हाण , श्याम वाघमारे , अक्षय नाईक , चंदन रानकर, आनंद जगधाने,संजय कोळी , गौतम किरवले ,शाखा अध्यक्ष विठ्ठल साळुंखे , केतन कोळी , संतोष बाजड , आशिष चोरगे, भरत लोंढे, किशोर जाधव , प्रकाश पाटील , संदीप डाकवे, सुशांत जाधव , अक्षय वडर, पुष्पा शेटे , करिश्मा पवार , योगेश कदम , यांच्या सह मोठया प्रमाणात मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक सामान्य नागरिक उपस्थित होते.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble