सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

शासनाच्या ‘दुर्गोत्सव’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका आयोजित ‘दुर्गबांधणी स्पर्धेला’ नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

महाराष्ट्र शासनाच्या वतीने अमृत ‘दुर्गोत्सव 2025’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या 12 दुर्गांचा युनोस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये अभिमानास्पद समावेश केल्याचा आनंद दिवाळी कालावधीत ठिकठिकाणी गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्याची आपली सांस्कृतिक परंपरा जपत साजरा केला जात आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होऊन दुर्गांची प्रतिकृती बनविणा-या समुहांना मुख्यमंत्री महोदय यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदनपत्र प्रदान करण्यात येत आहे.


          ‌ शासनाच्या या ‘दुर्गोत्सव’ उपक्रमामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने व शिक्षण विभागाच्या सहयोगाने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दुर्गबांधणी स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत शालेय स्तरावरील शिक्षक व विद्यार्थी समूह तसेच सोसायटी, वसाहती, संस्था येथील नागरिकांकडूनही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.


           शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दुर्गोत्सवात सहभागी होण्याकरिता 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत https://www.durgotsav.com/ या डिजीटल प्लॅटफॉर्मवर आपले नाव व इतर तपशीलासह फॉर्म भरून नोंदणी करावयाची आहे. दुर्गोत्सवात सहभागी होण्याकरिता रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग, खांदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग  अशा युनोस्काने जाहीर केलेल्या छत्रपती शिवरायांच्या बारापैकी समूहाने बनविलेल्या एका दुर्गासोबतचे सेल्फी छायाचित्र काढून ते त्याच डिजीटल प्लॅटफॉर्मवर अपलोड करावयाचे आहे. या छायाचित्राची अमृत संस्थेमार्फत वैधता पडताळणी सिध्द झाल्यानंतर भाग घेणा-या प्रत्येकास शासनाच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे ‘अभिनंदन पत्र’ डिजीटल स्वरूपात प्रदान केले जात आहे.


           दुर्गोत्सवासाठी बनविलेल्या दुर्ग प्रतिकृतीसाठी नागरिकांना अधिक प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने ‘दुर्गबांधणी स्पर्धा’ जाहीर केली असून उत्तम दुर्गनिर्मिती करणा-या समुहांना प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानीत केले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागाकरिता https://q.me-qr.com/wlRTYWOz या लिंकवर जाऊन स्पर्धा सहभागाचा अर्ज भरावयाचा आहे. दुर्गाच्या प्रतिकृतीमध्ये माती, दगड, पुठ्ठा, लाकूड, कागद, गवत, रांगोळी असे पर्यावरणपूरक व सुरक्षित साहित्य वापरावयाचे असून बनविलेल्या दुर्गाविषयीचा संक्षिप्त इतिहास त्या ठिकाणी फलकावर प्रदर्शित करणेही आवश्यक आहे. 


            ही स्पर्धा ‘शालेय गट’ तसेच ‘संस्था, मंडळे, सोसायट्या यांचा खुला गट’ अशा दोन गटांमध्ये होणार असून दोन्ही गटांना स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार आहेत. याकरिता नागरिकांनी https://q.me-qr.com/wlRTYWOz या डिजीटल प्लॅटफॉर्मवर 22 ऑक्टोबर 2025 रोजी, सायं. 5 वा. पर्यंत माहिती भरून प्रवेशअर्ज दाखल करावयाचा आहे. तसेच या लिंकवर आपण बनविलेल्या दुर्गाचे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर व वरील बाजूने संपूर्ण दुर्ग दिसेल असे एक छायाचित्र अशाप्रकारे एकूण 5 छायाचित्रांची पीडीए फाईल अपलोड करावयाची आहे.
           सदर छायाचित्रांच्या आधारे प्राथमिक फेरीचे परीक्षण होणार असल्याने छायाचित्रांमध्ये दुर्गाची प्रतिमा स्पष्ट व ठळक दिसेल याची काळजी घ्यायची आहे. छायाचित्रामधून संपूर्ण दुर्गाच्या प्रतिकृतीची माहिती मिळेल यादृष्टीने छायाचित्रे सादर करावयाची आहेत.


           या प्राथमिक फेरीमधून दोन्ही गटांकरिता स्वतंत्र दुर्गांची निवड अंतिम फेरीकरिता दि. 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून महानगरपालिकेची परीक्षण समिती दि. 25 व 26 ऑक्टोबर 2025 रोजी प्रत्यक्ष जागी जाऊन दुर्ग प्रतिकृतींची पाहणी करणार आहे. अंतिम फेरीप्रसंगी परीक्षण समितीसमोर दुर्गाबाबत 2 मिनीटांचे माहितीप्रद मौखिक सादरीकरण करणेही महत्वाचे आहे.
           ऐतिहासिक अचूकता, कलात्मकता व सर्जनशीलता, पर्यावरणपूरकता, सांघिक भावना व समन्वय, सादरीकरणाची पद्धत, स्वच्छता व बांधकामाची अचूकता, साहित्याचा प्रभावी वापर, परिसर व सजावट, सर्वांगीण छाप अशा 10 निकषांच्या आधारे परीक्षण केले जाणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी 9819555220 अथवा 9004761640 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.


          तरी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दुर्गोत्सव उपक्रमात प्रामुख्याने विद्यार्थी व नागरिकांनी उत्साहाने सहभागी होऊन युनोस्कोने जाहीर केलेल्या 12 दुर्गांपैकी एक दुर्ग प्रतिकृती निर्माण करावी व दिवाळीमध्ये किल्ले बनविण्याच्या आपल्या सांस्कृतिक परंपरेचा जागतिक विक्रम करण्यात आपला सहभाग द्यावा असे आवाहन करतानाच या दुर्गाची नोंदणी आपल्या नवी मुंबई शहरातून जास्तीत जास्त दुर्ग प्रतिकृती निर्माण व्हाव्यात यादृष्टीने आयोजित केलेल्या दुर्गबांधणी स्पर्धेतही करून सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

रिपोर्टर

  • Krutika Tushar Khanvilkar
    Krutika Tushar Khanvilkar (director)

    With an MBA in Marketing (First Class with Distinction) and a deep passion for business strategy and innovation, I aim to bring new ideas to life through clarity, creativity, and strong leadership. As the Director of The Global Times, I focus on driving growth, building meaningful collaborations, and creating opportunities that make an impact. My vision is to take our brand to global heights — through digital innovation, smart planning, and ethical business practices. I’m constantly learning, evolving, and planning to pursue my PhD further — because growth never stops.
    Dedicated to empowering teams, inspiring people, and setting new standards of excellence in the industry.

    Krutika Tushar Khanvilkar

संबंधित पोस्ट