या जगात माणुसकी अजून जिवंत आहे!
लोकलमध्ये सापडलेले रुपये ऐंशी हजार प्रामाणिकपणे परत करणाऱ्या मराठमोळ्या व्यक्तीचा आदर्श
माणुसकी आणि प्रामाणिकपणा हे शब्द आजच्या काळात अनेकदा केवळ वाचनात किंवा भाषणात ऐकायला मिळतात. पण काही मोजके लोक आपल्या कृतीतून या मूल्यांना पुन्हा उजाळा देतात. अशीच एक घटना नुकतीच नालासोपारा येथे घडली, ज्याने सर्वांच्या मनात मानवतेवरील विश्वास अधिक दृढ केला.
दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी श्री. रौनक वासा यांनी प्रवासादरम्यान बोरिवली लोकलमध्ये विसरलेली पिशवी — ज्यामध्ये रुपये ८०,००० (अक्षरी – ऐंशी हजार) होते — ती एका प्रामाणिक मराठमोळ्या नागरिकाने परत केली.
श्री. रौनक वासा हे बँकेतील कर्मचारी असून, त्यांनी आपली पिशवी लोकलमधून उतरताना विसरली. नेहमीप्रमाणे “लोकलमध्ये काही विसरले तर परत मिळेलच याची खात्री नाही” असा गैरसमज त्यांनाही होता. मात्र, नशिबाने त्यांना भेटले एक सत्य आणि माणुसकीचा धनी – श्री. रविंद्र पवार.
श्री. रविंद्र पवार हे जीवनविद्या मिशन, नालासोपारा शाखेचे अध्यक्ष तसेच म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस असून, ते महानगरपालिकेतील प्रतिष्ठित कर्मचारी आहेत. बोरिवली स्थानकात रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात त्यांना ती पिशवी सापडली. पिशवीतील पाकिटावर “यु.जी.एस. ए. जी., शेड्युल कमर्शियल बँक, वरळी, मुंबई” असा पत्ता आढळला.
प्रामाणिकतेचा आदर्श घालून देत श्री. पवार यांनी त्या बँकेत प्रत्यक्ष जाऊन व्यवस्थापकांना भेट दिली. सखोल चौकशीनंतर ही रक्कम खरंच श्री. रौनक वासा यांची असल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ त्यांनी श्री. वासा यांच्याशी संपर्क साधून कांदिवली रेल्वे पोलिसांच्या समक्ष संपूर्ण रक्कम – रुपये ऐंशी हजार – परत केली.
या कृतीने केवळ श्री. वासा यांचा विश्वास परत मिळाला नाही, तर समाजातही प्रामाणिकतेचा आणि माणुसकीचा प्रेरणादायी संदेश गेला. श्री. रविंद्र पवार यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनी त्यांना खरी माणुसकी जपणारा आदर्श म्हणून गौरविले आहे.
ही घटना पुन्हा एकदा दाखवते की —
या जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे.
समाजात असे प्रामाणिक आणि सद्विचारांचे लोक आहेत, जे निस्वार्थपणे सत्य, जबाबदारी आणि चांगुलपणाची मशाल पेटती ठेवत आहेत.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
With an MBA in Marketing (First Class with Distinction) and a deep passion for business strategy and innovation, I aim to bring new ideas to life through clarity, creativity, and strong leadership. As the Director of The Global Times, I focus on driving growth, building meaningful collaborations, and creating opportunities that make an impact. My vision is to take our brand to global heights — through digital innovation, smart planning, and ethical business practices. I’m constantly learning, evolving, and planning to pursue my PhD further — because growth never stops.
Krutika Tushar KhanvilkarDedicated to empowering teams, inspiring people, and setting new standards of excellence in the industry.