कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र
रत्नागिरी : कोकण आता मागे राहणार नाही. मुंबई, पुणे, नागपूरच्या पंक्तीत उभं राहणार! वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कोकणासाठी गेम चेंजर ठरणाऱ्या
महामार्ग, ग्रोथ सेंटर्स, पर्यटन हब आणि उद्योग प्रकल्पांची घोषणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांना आव्हान दिलं. हे केवळ रस्ते नाहीत, हा कोकणाच्या भविष्याचा मार्ग आहे. जो रोजगार, उद्योग आणि समृद्धी थेट गावागावात घेऊन येणार आहे! अशा शब्दांत त्यांनी कोकणाच्या विकासाची रणभेरी फुंकली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील साळवी स्टॉप परिसरात झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणासाठी 'गेम चेंजर' ठरणाऱ्या प्रकल्पांची आक्रमक भूमिका मांडत विकासाचा थेट अजेंडा समोर ठेवला.
सागरी मार्ग आणि कोस्टल रोडच्या कडेला उभारण्यात येणारी ११ ग्रोथ सेंटर्स ही कोकणाच्या अर्थव्यवस्थेची नवी इंजिनं ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या केंद्रांमुळे हजारो नव्हे तर लाखो लोकांच्या हाताला रोजगार मिळणार असून, नोकरीसाठी गाव सोडण्याची वेळ येणार नाही. मत्स्य उद्योग, काजू, नारळ, आंबा प्रक्रिया उद्योगांना विशेष पॅकेज देऊन स्थानिक उत्पादकांना जागतिक बाजाराशी जोडण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
कोकणाच्या ७२० किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनाच्या दृष्टीने पूर्ण वापर करून 'ग्लोबल व्हिलेज' संकल्पना राबवली जाणार असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. बीच कनेक्टिव्हिटी, पर्यटन हब, रिसॉर्ट्स, वॉटर स्पोर्टस आणि स्थानिक हस्तकलेला प्रोत्साहन देऊन कोकणाला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
दाभोळ खाडीवरील पूल, पानंद रस्ते, ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना आणि ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांचं मजबूत जाळं उभं केलं जात असल्याचाही त्यांनी आढावा घेतला. एमएसआरडीसीमार्फत रस्ते, सागरी मार्ग आणि कोस्टल कनेक्टिव्हिटीला गती देण्यात येत असून, त्यामुळे उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
With an MBA in Marketing (First Class with Distinction) and a deep passion for business strategy and innovation, I aim to bring new ideas to life through clarity, creativity, and strong leadership. As the Director of The Global Times, I focus on driving growth, building meaningful collaborations, and creating opportunities that make an impact. My vision is to take our brand to global heights — through digital innovation, smart planning, and ethical business practices. I’m constantly learning, evolving, and planning to pursue my PhD further — because growth never stops.
Krutika Tushar KhanvilkarDedicated to empowering teams, inspiring people, and setting new standards of excellence in the industry.