मेनोपॉजचा त्रास सहन करत बसू नका, सखी तुमच्यासोबत आहे .
असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (ए . आर . एच .) या ४० वर्षे होमिओपॅथीमध्ये अविरतपणे काम करणाऱ्या अग्रगण्य संस्थेने अलीकडेच "सखी मेनोपॉज क्लिनिक" ऐरोली , नवी मुंबई येथे सुरु केले आहे . या क्लिनिकचे अनावरण वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.रमा अशोक वैद्य यांच्या हस्ते १५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. त्यांनी अनेक वर्षे स्त्रियांंच्या आजाराबाबत संशोधन केले आहे.
सखी मेनोपॉज क्लिनिक च्या प्रमुख डॉ . संगीता ठक्कर यांनी सांगितले की आधुनिक जीवनशली , व्यायामांचा अभाव आणि कुटुंबातील विविध भूमिका एकत्र पार पडताना स्त्रियांंवर येणार ताणतणाव या सर्वच गोष्टींमुळे स्त्रियांंना होणाऱ्या हामोन्सच्या आजारांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे .मेनोपॉज हा एक आजार नसून स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक बदल आहे .परंतु हा बदल होताना स्त्रियांंना वेगवेगळी लक्षणे सतावू शकतात. उदा. अचानक खूप गरम होणे व घाम येणे , व्यवस्थित झोप न लागणे , सतत चिडचिड होणे किंवा रडावेसे वाटणे ,थकवा जाणवणे , नेहमीची कामे न करविशी वाटणे, सांधे दुखणे इत्यादी.
महत्त्वाचे म्हणजे अंदाजे ७५% ते ८०% महिलांना मेनोपॉजदरम्यान काही ना काही लक्षणे जाणवतात . तरीसुध्दा आमच्या अनुभवानुसार बराचश्या महिलांना आपण मेनोपॉज या अवस्थेतून जात आहोत हे माहितीच नसते. .यावरूनच समाजातील मेनोपॉजबाबतची अनभिज्ञता असलेली दिसते.याच अनुशंगाने अलीकडेच महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये मेनोपॉज क्लीनिक्स चालू केली आहेत आणि हा स्तुत्य उपक्रम आहे.आमच्या सखी मेनोपॉज क्लिनिकमध्ये आम्ही स्त्रियांंच्या प्रकृतीचा सर्वांगिण व संवेदनशलपणे विचार करतो. कारण या मेनोपॉजच्या लक्षणांचा प्रभाव त्या स्त्रीपुरता मर्यादित न राहता तिच्या कुटुंबावरही होत असतो.काही कुटुंबांमध्ये यामुळे दांपत्यांनी घटस्फोट ही घेतलेले आढळतात.
या क्लिनिकचा उद्देश स्त्रियांमध्ये मेनोपॉजबद्दल फक्त जागरूकता निर्माण करण्यापुरता मर्यादित नसून त्यांना गरजेनुसार उपचार देणे, आहार आणि व्यायाम याबाबत सल्ला देणे , तसेच गरज भासल्यास वैयक्तिक समुपदेशन (counselling) करणे हा आहे. क्लिनिकचा असा अनुभव आहे की प्रत्येक महिलेसाठी वैयक्तक वेगवेगळा उपचार करावा लागतो . एकाच औषधाने सर्वांना फायदा होणार नाही. त्यामुळे सुरवातीलाच प्रत्येक महिलेची सखोल हिस्ट्री घेऊन, मूलभूत तपासण्या करून त्या महिलेसाठी वैयक्तिक उपाययोजना करावी लागते.
"सखी मेनोपॉज क्लिनिक" अंतर्गत ए. आर. एच. ने महिला हदनाननशमि वार्षिक कार्यक्रम शुक्रवार दिनांक ६ मार्च रोजी सायंकाळी आयोजित केला होता .या कार्यक्रमामध्ये मेनोपॉजबद्दल थोडक्यात माहिती देऊन मनोरंजक खेळ व परस्पर संवादातून मेनोपॉजबद्दल जागृती करण्यात आली. या काकार्यक्रमासाठी ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन आणि बंधन बँक यांनी ए. आर. एच. ला सहकार्य केले. या कार्यकमाची क्षणचित्रे आमच्या Instagram Page @homoeopathyforall.arh ला भेट देऊन पाहता येतील. ए. आर. एच. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वृर्षाली देशमुख यांच्या मते मेनोपॉज बद्दलची जागरूकता फक्त शियांपुरती मर्यादित न ठेवता आपण पुरुषांनाही याबाबत जागरूक केले तर, ते आपल्या सहचारिणीला या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यातून संवेदनक्षमरित्या बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतील .
लेखक - डॉ स्वप्निल अशोक पाटणे ,
ए. आर. एच. या संस्थेचे और्षोधोपचार व संशोधन विभाग प्रमुख आहेत .
अपॉइंटमेंटसाठी संपर्क साधावा - ९९८७४१३३०१/ ९९८७४१४४४०/ ९९८७४१८४७४
ई-मेल- sangeeta.thacker@arhcm.org
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
With an MBA in Marketing (First Class with Distinction) and a deep passion for business strategy and innovation, I aim to bring new ideas to life through clarity, creativity, and strong leadership. As the Director of The Global Times, I focus on driving growth, building meaningful collaborations, and creating opportunities that make an impact. My vision is to take our brand to global heights — through digital innovation, smart planning, and ethical business practices. I’m constantly learning, evolving, and planning to pursue my PhD further — because growth never stops.
Krutika Tushar KhanvilkarDedicated to empowering teams, inspiring people, and setting new standards of excellence in the industry.