Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw
- Feb 05, 2026
- 92 views
मध्य रेल्वेने ०९.०३.२०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा केला. सेंट्रल स्टाफ बेनिफिट फंड (CSBF) च्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेच्या महिला कर्मचारी यशस्वीतांचा सत्कार करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वर्षीची थीम "गिव्ह टू गेन" होती, या अंतर्गत महिलांसाठी संधी, पाठिंबा, आदर, समानता आणि मान्यता या गोष्टींचा समावेश होता. त्याअंतर्गत या प्रक्रियेत महिलांच्या प्रगती, सक्षमीकरण, प्रेरणा आणि न्याय्य समाज या मूलभूत मंत्रावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री प्रतीक गोस्वामी आणि मान्यवरांनी पारंपारिक दीपप्रज्वलन करून आणि गणेश वंदना करून केली.
मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी आणि सीएसबीएफचे अध्यक्ष श्री पी. पी. पांडे यांनी मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत केले आणि स्वागत भाषण केले.
लोको पायलट, खाजगी सचिव, तंत्रज्ञ, अभियंते, व्यावसायिक निरीक्षक, शिक्षक, रुग्णालय सहाय्यक, विभाग अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, लिपिक, आरपीएफ कर्मचारी आणि कार्यालयीन सहाय्यक अशा विविध विभागांमधून एकूण ३६ महिला कर्मचाऱ्यांना सत्कारासाठी निवडण्यात आले.
यामध्ये मुख्यालयातील १२ कर्मचारी, मुंबई विभागातील ३ कर्मचारी, परळ, भायखळा आणि माटुंगा कार्यशाळेतील प्रत्येकी २ कर्मचारी, सोलापूर विभागातील ३ कर्मचारी, पुणे आणि नागपूर विभागातील प्रत्येकी २ कर्मचारी आणि भुसावळमधील ८ कर्मचारी (विभाग, झेडआरटीआय, इलेक्ट्रिक लोको कार्यशाळा-भुसावळ आणि ट्रॅक देखभाल कार्यशाळा, नाशिक रोड) यांचा समावेश होता.
वरीलपैकी, मुंबई विभाग, परळ, माटुंगा आणि भायखळा कार्यशाळेतील व मुख्यालयातील २१ यशस्वी महिल कर्मचाऱ्यांना वैयक्तिकरित्या पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार विजेत्यांमध्ये श्रीमती अनुराधा रॉय यांचा समावेश होता, ज्यांना ०८.०३.२०२६ रोजी नवी दिल्ली येथे रेल्वे बोर्डातर्फे उत्कृष्ट महिला पुरस्काराने गौरविण्यात आले.
विभागातील महिला कर्मचाऱ्यांचे पुरस्कार विभागीय प्रतिनिधींना देण्यात आले आणि संबंधित डीआरएमकडून महिला कर्मचारी यशस्वीतांना ते प्रदान करण्यात आले.
याशिवाय महिला सक्षमीकरण उपक्रमांचा भाग म्हणून ८ अवलंबित अविवाहित मुलींना सायकली आणि ३ अवलंबित पत्नींना (महिला) शिलाई मशीन भेट देण्यात आल्या.
या प्रसंगी बोलताना, समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि महाव्यवस्थापक श्री प्रतीक गोस्वामी म्हणाले की, मध्य रेल्वेमध्ये मुख्यालय आणि ५ विभागांमध्ये विविध विभागात काम करणाऱ्या सुमारे ९००० महिलांचा एक मजबूत कर्मचारी वर्ग आहे. मध्य रेल्वेवर महिला सक्षमीकरणासाठी बरेच काही केले जात आहे, परंतु अजूनही बरेच काही करायचे आहे.
कार्यक्रमातील अतिथी वक्त्या, लेखिका आणि टिइडी (तंत्रज्ञान, मनोरंजन आणि डिझाइन) च्या अभ्यासक श्रीमती अनुपमा पांडे यांनी स्वतःचा शोध घेणे, आत्मसाक्षात्कार आणि एखाद्याच्या जीवनात महिलांचे महत्त्व या विषयावर एक अद्भुत सादरीकरण केले.
भारतीय रेल्वेत महिलांद्वारे संचालन होणारे पहिले स्थानक चालवण्याचा मान मध्य रेल्वेला मिळाला आहे, तो म्हणजे माटुंगा स्थानक आणि त्यानंतर अजनी आणि अमरावती.
मध्य रेल्वे महिलांसाठी महिला विशेष उपनगरीय रेल्वे सेवा देखील चालवते. मेरी सहेली आणि महिला सुरक्षा सारखे उपक्रम महिला प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करतात आणि मातृशक्ती उपक्रमांतर्गत गर्भवती महिलांना मदत करणे ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे परिसरात बाळंतपणात मदत करणे समाविष्ट आहे.
या कार्यक्रमादरम्यान, विभागीय प्रमुख श्री हिरेश मीना, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वे मुख्यालय आणि मुंबई विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सीआरडब्ल्यूडब्ल्यूओचे पदाधिकारी आणि मान्यताप्राप्त संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
----------
दिनांक: ०९ मार्च २०२६
प्र.प. क्रमांक: २०२६/०३/१३
सदर प्रसिद्धी पत्रक डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी केले आहे.
रिपोर्टर
With an MBA in Marketing (First Class with Distinction) and a deep passion for business strategy and innovation, I aim to bring new ideas to life through clarity, creativity, and strong leadership. As the Director of The Global Times, I focus on driving growth, building meaningful collaborations, and creating opportunities that make an impact. My vision is to take our brand to global heights — through digital innovation, smart planning, and ethical business practices. I’m constantly learning, evolving, and planning to pursue my PhD further — because growth never stops.
Krutika Tushar KhanvilkarDedicated to empowering teams, inspiring people, and setting new standards of excellence in the industry.