डोकेदुखीला कायमचा रामराम - विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु पुण्यात विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल? नारळाच्या झाडांवरून नवा वाद Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

डोकेदुखीला कायमचा रामराम - विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु

       ऐरोली येथील असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी  (ए. आर. एच.) या होमिओपॅथित काम करणाऱ्या अग्रगण्य संस्थेने डोकेदुखी निवारणासाठी विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु केले आहे. या क्लिनिकचे उद्घाटन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रमेश भोंडे यांच्या हस्ते करण्यात आले.     

         या क्लिनिकचे प्रमुख डॉ. पराग म्हात्रे म्हणाले, डोकेदुखी हे इतके सामान्य लक्षण आहे की आपण सर्वांनी डोकेदुखी आयुष्यात एकदा तरी अनुभवलेली असते. काही जणांना वेळेवर जेवण झाले नाही तरीही डोकेदुखी होते, काहींना दैनंदिन जीवनाच्या ताणतणावामुळे, महिलांना हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे डोकेदुखी होऊ शकते. लहान मुलांना चश्मा लागल्यास, तर काहीना सर्दी व ताप आल्यास डोकेदुखी हैराण करते. या डोकेदुखीत प्रमुख प्रकार म्हणजे मायग्रेन (अर्धशिशी) जी अतिशय वेदनादायक असते. जरी डोकेदुखी बहुतांश वेळेला साध्या आजाराचे लक्षण असले तरी काही वेळेला मोठ्या आजाराचेही लक्षण असू शकते. उदा. मेंदूतील गाठ (brain tumor) किंवा मेंदूतील रक्तस्त्राव इत्यादी. त्यामुळे डोकेदुखीकडे दुर्लक्ष करणे रुग्णांसाठी चिंताजनक ठरू शकते. त्यामुळे योग्य वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक असते.


रुग्णाला असलेली डोकेदुखी ही वारंवार उद्भवणारी आहे का? ती किती वेळ राहते? त्या वेळेला उजेड व आवाज सहन होत नाही का? डोकेदुखीबरोबर ताप किंवा दृष्टीमध्ये अडथळे येतात का? किंवा मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणे सुध्दा आहेत का? डॉक्टर अशातऱ्हेचे अनेक प्रश्न विचारून, तसेच गरज पडल्यास कधी तपासण्या करून या डोकेदुखीच्या मूळ कारणाचे निदान करू शकतात. त्यामुळे त्यांचा सल्ला तुमची डोकेदुखी पूर्णपणे बरी करू शकतो.

       होमिओपॅथीमध्ये याहीपेक्षा अजून जास्त सखोल प्रश्न विचारून तुमच्या डोकेदुखीचे मूळ कारण शोधून काढण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक अवस्थेचाही विचार केला जातो. त्यानंतरच रुग्णाला वैयक्तिक स्वरूपाचा उपचार दिला जातो. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वृषाली देशमुख म्हणाल्या, ए. आर. एच. च्या डोकेदुखीसाठीच्या  होमिओपॅथीक क्लिनिकचे उद्दिष्ट रुग्णांना सुरक्षित, सौम्य आणि दुष्परिणाम मुक्त उपचार उपलब्ध करून देणे हा आहे. त्याचबरोबर यामुळे लोकांचे डोकेदुखीसाठी वेदनाशामक औषधे (Pain killers) खाण्याचे प्रमाण देखील कमी होईल. प्रत्येक रुग्णाला या क्लिनिकमध्ये आहार, व्यायाम आणि जीवनशैली याबद्दलही मार्गदर्शन केले जाईल. 

आधुनिक जीवनातील वाढत्या ताणतणावामुळे उध्दभवणाऱ्या डोकेदुखीच्या या समस्येवर होमिओपॅथिच्या माध्यमातुन नैसर्गिक आणि दीर्घकालीन समाधान देण्याचा आमचा प्रयत्न राहील. समाजातील सर्वानी ए. आर. एच. च्या ऐरोली येथील सेंटरमध्ये या विशेष सेवांचा लाभ घ्यावा आणि निरोगी वेदनामुक्त जीवनाकडे वाटचाल करावी हीच आमची अपेक्षा आहे.             

लेखक : डॉ. स्वप्निल अशोक पाटणे

औषधोपचार व संशोधन विभाग प्रमुख, ए. आर. एच, ऐरोली. 

संपर्क : 9987413301/9987414440/9987418474 

ईमेल – parag.mhatre@arhcm.org


रिपोर्टर

  • Krutika Tushar Khanvilkar
    Krutika Tushar Khanvilkar (director)

    With an MBA in Marketing (First Class with Distinction) and a deep passion for business strategy and innovation, I aim to bring new ideas to life through clarity, creativity, and strong leadership. As the Director of The Global Times, I focus on driving growth, building meaningful collaborations, and creating opportunities that make an impact. My vision is to take our brand to global heights — through digital innovation, smart planning, and ethical business practices. I’m constantly learning, evolving, and planning to pursue my PhD further — because growth never stops.
    Dedicated to empowering teams, inspiring people, and setting new standards of excellence in the industry.

    Krutika Tushar Khanvilkar

संबंधित पोस्ट