‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

दिल्लीतील विवेक विहारमध्ये एसीमध्ये भीषण स्फोट ९ जणांचा चा होरपळून मृत्यू .

नवी दिल्ली, २ मे २०२६: राजधानी दिल्लीतील शाहदारा परिसरातील विवेक विहार येथे रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक रहिवासी जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत रविवारी दि २ मे रोजी भल्या पहाटे एका भीषण आगीत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील शाहदारा येथील विवेक विहार येथे असलेल्या चार मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत इमारतीतील ९ जणांचा मृत्यू झाला असून इतर काही रहिवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही आग इमारतीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील फ्लॅटपर्यंत पसरली होती. पूर्व दिल्लीतील विवेक विहार परिसरात भीषण आग लागल्याची माहिती पहाटे ३.४७वाजता अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १४ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यावेळी दाट धूर आणि ज्वाला वेगाने पसरत होत्या, पण अग्निशमन दलाच्या बचावकार्यादरम्यान १०ते १५ रहिवाशांना इमरातीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. पण रजणांचा या दुर्घटने मृत्यू झाला आहे. जखमींपैकी काही जणांना किरकोळ इजा झाली आहे. दोन जणांना गंभीर इजा झाली असून त्यांना उपचारासाठी गुरु तेग बहादूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, इमारतीतील एका एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. रात्रभर एसी सुरू असताना इमारतीतील बॅल्कनीत असेलेल्या एसीच्या मशीनमध्ये स्फोट झाला असल्याचे चित्र दिसत आहे. इमरातीच्या दुसऱ्या मजल्यावर या आगीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आग परसण्यापासून थांबवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या विवेक विहार परिसरात तैनात करण्यात आल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात दलाला यश मिळालं.


इमारतीतील रहिवासी रोहित या घटनेबद्दल बोलताना सांगितले, "एसीच्या स्फोटामुळे ही आग लागली आहे. सुमारे १0-१५ रहिवाशांना वाचवण्यात यश आले आहे. रविवारी पहाटे ३.१३च्या सुमारास इमारतीला आग लागली असून ३.३५च्या सुमारास अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. प्राथमिक अंदाजानुसार एसी मशीनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. तरी अधिकारी अजून पुढील तपास करत आहेत.

  • घटना: पहाटे ३.१३ वाजता चार मजली इमारतीला आग लागली. काही मिनिटांतच दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ज्वाळा पसरल्या.

  • बचावकार्य: ३.३५ वाजता अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दाट धूर आणि ज्वाळांमधून १0 ते १५ रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

  • मृत्यू व जखमी: या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी असून त्यांना गुरु तेग बहादूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • कारण: प्राथमिक अंदाजानुसार, इमारतीतील एसी मशीनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. काही रहिवाशांनी एसीच्या स्फोटामुळे आग लागल्याचे सांगितले आहे.

  • परिस्थिती: आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सर्वाधिक नुकसान झाले आहे.

    या भीषण आगीमुळे विवेक विहार परिसरात हाहाकार माजला आहे. अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रिपोर्टर

  • Sanket Jadhav
    Sanket Jadhav (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Sanket Jadhav

संबंधित पोस्ट