‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

"रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर तुफान – मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास!"

‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक देत अवघ्या तीन दिवसांत कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित हा ऐतिहासिक चित्रपट १ मे रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. रिलीजपूर्वीच या चित्रपटाची मोठी चर्चा होती आणि आता प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे चित्रपटगृहांमध्ये गर्दी वाढताना दिसत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग घेत 11.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी थोडी घसरण झाली असली तरी शनिवारी चित्रपटाने 10.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. मात्र रविवारी सुट्टीचा मोठा फायदा चित्रपटाला मिळाला आणि तिसऱ्या दिवशी तब्बल 12 कोटी रुपयांची कमाई झाली. यामुळे ‘राजा शिवाजी’ची तीन दिवसांची एकूण कमाई 33.90 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री आणि जेनेलिया डिसूझा यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. तसेच सलमान खानच्या खास कॅमिओचीही प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. ‘ठाकरे’, ‘टाइमपास’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या चित्रपटांच्या कमाईलाही ‘राजा शिवाजी’ने मागे सोडले आहे. त्यामुळे हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘राजा शिवाजी’ची जोरदार चर्चा असून येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी मोठे विक्रम करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

भारतातील टॉप 10 सर्वाधिक कमाई करणारे मराठी चित्रपट (कमाईचा डेटा)

सैराट - 80.98 कोटी

बाईपण भारी देवा - 76.28 कोटी

वेड - 61.20 कोटी

नटसम्राट - 42 कोटी

पावनखिंड - 37.72 कोटी

लय भारी - 37 कोटी

कट्यार काळजात घुसली - 35 कोटी

राजा शिवाजी - 33.90 कोटी (तीन दिवसांचे संकलन)

ठाकरे - 31.6 कोटी

टाईमपास - 30 कोटी

रिपोर्टर

  • Sanket Jadhav
    Sanket Jadhav (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Sanket Jadhav

संबंधित पोस्ट