ठाण्यात नितीन कंपनी उड्डाणपूलाजवळ भीषण अपघात
सहा वाहनांची एकमेकांना धडक, एकजण जखमी
ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी उड्डाणपूलाजवळ सोमवारी भीषण अपघातात सहा वाहनांची एकमेकांना धडक बसली. या अपघातात शेख शाबीर महमूद (२२) या टेम्पो चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामध्ये चार कार आणि दोन टेम्पोचा सामावेश असून वाहनांचे नुकसान झाले आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील नाशिकहून मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकवर सोमवारी दुपारी १.४७ वाजता हा अपघात झाला. नितीन कंपनी उड्डाणपूलावरून दोन टेम्पो आणि चार कार मुंबईच्या दिशेने वाहतुक करत होते. त्याचवेळी या वाहनांची अचानक एकमेकांना धडक बसली. या अपघातात टेम्पो चालक शेख शाबीर मोहम्मद हा जखमी झाला. त्याच्या डाव्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती कोपरी वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील आणि वागळे वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांना मिळाल्यानंतर वाहतुक पोलीस अधिकारी, नौपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शेख हे टेम्पोमध्ये जखमी अवस्थेत अडकले होते. पथकांनी त्यांना सुरक्षित टेम्पो बाहेर काढले. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Sanket Jadhav