भव्य-दिव्य आणि दिमाखदार आयोजनात कामोठेत रंगली “मिनी महाराष्ट्र केसरी”
परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कुस्ती स्पर्धेला हजारोंचा प्रतिसाद
पनवेल (हरेश साठे) : महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीचा थरार, हजारो क्रीडाप्रेमींची उपस्थिती, मातीतल्या लढतींचा जल्लोष आणि भव्य-दिव्य आयोजनाचा दिमाखदार अशा उत्साहपूर्ण वातावरणात कामोठे येथे “मा. श्री. परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” हि जंगी कुस्ती स्पर्धा शानदारपणे पार पडली. भाजपचे युवा नेते, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कामोठे सेक्टर ०६ येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेने अक्षरशः “मिनी महाराष्ट्र केसरी”चा अनुभव उपस्थितांना दिला. नेपाळ, महाराष्ट्र राज्यासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि इतर राज्यांतील नामांकित मल्लांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात कुस्तीचा जल्लोष पाहायला मिळाला.
यामधील मुख्य स्पर्धेतील विजेत्यांना मानाची गदा आणि रोख रक्कम पारितोषिक देऊन सन्मानित आले.
या कुस्ती सामन्यांचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपमहापौर प्रमिला पाटील, उपसभापती भूपेंद्र पाटील, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, खोपोली महापालिकेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, सभागृहनेते ऍड. प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, पेण नगरपरिषदेचे गटनेते अनिरुद्ध पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिल घरत, भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, भाजपचे खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नविन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, कुस्तीगीर संघटनेचे बळीराम पाटील, आयोजक नगरसेवक हॅप्पी सिंग, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, सुप्रसिद्ध कुस्तीपटू आणि प्रशिक्षक रुपेश पावशे, कामोठे महिला मोर्चाच्या अध्यक्षा वनिता पाटील, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ पैलवान, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी युवानेते परेश ठाकूर यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी हजारो मान्यवरांनी आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना आमदार नितेश राणे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. कुस्ती स्पर्धेच्या वातावरणाचे कौतुक करताना ते म्हणाले की, माझा आणि कुस्तीचा थेट संबंध दिसेल असे वाटत नाही, कारण आमचा आखाडा वेगळा आहे. आमचा आखाडा हिंदुत्वाचा असून आम्ही रोज 'हिरवे साप' ठेचतो, त्यामुळे या आखाड्यात आणि आमच्या आखाड्यात फरक आहे. पुढे बोलताना राणे म्हणाले की, साधारणपणे एवढी भव्य कुस्ती स्पर्धा फक्त पश्चिम महाराष्ट्रातच पाहायला मिळते असा एक समज आहे. मात्र, आज कामोठ्यात झालेली ही गर्दी आणि आयोजन पाहिल्यानंतर आम्हीही पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कुठेही कमी नाही, असाच स्पष्ट संदेश परेश ठाकूर यांच्या माध्यमातून गेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र येणे हे परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाची वाढती ताकद दाखवणारे आहे, असे सांगत परेश ठाकूर यांचे भविष्य उज्वल असल्याचे सांगून वाढदिवसाच्या आणि भावी वाटचालीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. या भव्य 'परेश ठाकूर केसरी' कुस्ती स्पर्धेने संपूर्ण पनवेल आणि रायगड जिल्ह्यात एक नवा इतिहास रचला असून, या अभूतपूर्व क्रीडा सोहळ्याची चर्चा आता महाराष्ट्रभर रंगली आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर हे दोन्ही सुपुत्र करत आले आहेत.
ते शांत पण धाडसी व्यक्तिमत्व असून लोकांना आधार आणि मदत देण्याचे काम करत असतात. कुस्ती आणि माझे जवळचे नाते आहे. हि स्पर्धा अत्यंत सुरेख असा अनुभवायला मिळाला, अशा शब्दात खासदार श्रीरंग बारणे यांनी शुभेच्छा दिल्या. तर आमदार निरंजन डावखरे यांनी कोकणच्या भूमीत पण कुस्तीवर प्रेम करणारी लोकं आहेत हे या कुस्ती सामन्यातून स्पष्ट होत असल्याचे मत व्यक्त केले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी सहभाग घेतल्याने प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा आणि रोमांचकारी ठरला. मुख्य कुस्तीमध्ये रुस्तम-ए-हिंद पै. सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा सुप्रसिद्ध मल्ल पै. लाली चमकोर, उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत विरुद्ध पै. बागा सिंघ, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी विरुद्ध हिंद केसरी पै. संदीप कुमार तसेच महाराष्ट्र केसरी पै. दादा शेळके विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. माउली कोकाटे यांच्या लढतींनी प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचवला.महिला गटातील सामनेही आकर्षणाचे केंद्र ठरले. पै. अमेघा घरत विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेती पै. एकता शर्मा, पै. पलक यादव विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. वेदांतिका पवार तसेच नेपाळची सुप्रसिद्ध मल्ल पै. रुबी थापा विरुद्ध उत्तराखंडची पै. कोमल यांच्या लढतींना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत जवळपास ७५ सामने खेळविण्यात आले. विजेत्या मल्लांसाठी तब्बल १५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे स्थानिक आणि ग्रामीण भागातील नवोदित मल्लांनाही या व्यासपीठावर संधी देण्यात आल्याने अनेक तरुण खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली.स्पर्धेसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भव्य मैदान, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, वैद्यकीय सुविधा, हलगीचा ताल, मर्दानी आवाजात सूत्रसंचालन, सुरक्षेची काटेकोर व्यवस्था आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे स्पर्धेचे आयोजन सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरले.
परेश ठाकूर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. युवकांना प्रोत्साहन मिळावे, ग्रामीण भागातील प्रतिभेला व्यासपीठ मिळावे आणि महाराष्ट्राची पारंपरिक कुस्ती संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने ते सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. कुस्ती हा केवळ खेळ नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा आत्मा आहे. ग्रामीण भागातील नवोदित मल्लांना संधी आणि प्रोत्साहन मिळावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, दरवर्षीप्रमाणे यंदाही “मा. श्री. परेशशेठ ठाकूर केसरी” स्पर्धेने क्रीडाप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले असून, पनवेल तालुक्यातील हा क्रीडा महोत्सव आता प्रतिष्ठेची ओळख बनला आहे.त्यामुळे या ठिकाणी स्पर्धेने मोठी उंची गाठून एकप्रकारे कुस्तीचे महाधिवेशन निर्माण केले होते.
| सामना | निकाल |
|---|---|
| १. रुस्तम-ए-हिंद पै. सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा सुप्रसिद्ध मल्ल पै. लाली चमकोर | पै. सिकंदर शेख विजयी |
| २. उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत विरुद्ध पै. बागा सिंघ | पै. किरण भगत विजयी |
| ३. ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी विरुद्ध हिंद केसरी पै. संदीप कुमार | पै. विजय चौधरी विजयी |
| ४. महाराष्ट्र केसरी पै. दादा शेळके विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. माउली कोकाटे | कुस्ती बरोबरीत सुटली |
| ५. पै. अमेघा घरत विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेती पै. एकता शर्मा | पै. एकता शर्मा विजयी |
| ६. पै. पलक यादव विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. वेदांतिका पवार | पै. वेदांतीका पवार विजयी |
| ७. नेपाळची सुप्रसिद्ध मल्ल पै. रुबी थापा विरुद्ध उत्तराखंडची पै. कोमल | पै. रुबी थापा विजयी |
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times