‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

ठाण्यातील गावदेवी मार्केटमध्ये भीषण आग ; दोघांचा मृत्यू .

ठाणे : गुरुवारी (२१ मे) पहाटेच्या सुमारास ठाण्यातील गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळील भाजी मार्केटला लागलेल्या भीषण आगीत महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास कार्यालयाखालील एका गाळ्यातील गॅरेजला प्रथम आग लागली. त्यानंतर आग भडकत गेली. ही आग विझवण्याचे प्रयत्न करताना गावदेवी

प्रभाग समिती कार्यालयाचे सुरक्षारक्षक काळू शंकर गाडेकर (५३) आणि ठाणे अग्निशमन दलाचे अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे (४३) यांच्यावर काळाने घाला घातला. या आगीत महापालिकेच्या कार्यालयाचे नुकसान झाले नाही मात्र, खालील गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे,

अशी माहिती महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी जाहीर केला. तसेच जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. शिवाय या आगीच्या दुर्घटनेची चौकशी केली जाईल, असे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेत अग्रिशमन दलाचे सुजित पष्टे (४५) आणि समीर जाधव (४०) जखमी झाले आहेत. गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळ पहाटे

३ बाजून ४० मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान ५ फायर वाहनांसह घटनास्थळी पोहोचले होते. याचबरोबर तीन जम्बो वॉटर टँकर, २ वॉटर टँकरसह ४ रेस्क्यू वाहने आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी होते. या ताफ्यामध्ये एका पिकअप वाहनासह, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे महापालिकेच्या तीन रुग्णवाहिका, रुग्णवाहिका, खासगी वॉटर टँकर होते.

रिपोर्टर

  • Sanket Jadhav
    Sanket Jadhav (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Sanket Jadhav

संबंधित पोस्ट