ठाण्यातील गावदेवी मार्केटमध्ये भीषण आग ; दोघांचा मृत्यू .
ठाणे : गुरुवारी (२१ मे) पहाटेच्या सुमारास ठाण्यातील गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळील भाजी मार्केटला लागलेल्या भीषण आगीत महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास कार्यालयाखालील एका गाळ्यातील गॅरेजला प्रथम आग लागली. त्यानंतर आग भडकत गेली. ही आग विझवण्याचे प्रयत्न करताना गावदेवी
प्रभाग समिती कार्यालयाचे सुरक्षारक्षक काळू शंकर गाडेकर (५३) आणि ठाणे अग्निशमन दलाचे अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे (४३) यांच्यावर काळाने घाला घातला. या आगीत महापालिकेच्या कार्यालयाचे नुकसान झाले नाही मात्र, खालील गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे,
अशी माहिती महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी जाहीर केला. तसेच जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. शिवाय या आगीच्या दुर्घटनेची चौकशी केली जाईल, असे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेत अग्रिशमन दलाचे सुजित पष्टे (४५) आणि समीर जाधव (४०) जखमी झाले आहेत. गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळ पहाटे
३ बाजून ४० मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान ५ फायर वाहनांसह घटनास्थळी पोहोचले होते. याचबरोबर तीन जम्बो वॉटर टँकर, २ वॉटर टँकरसह ४ रेस्क्यू वाहने आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी होते. या ताफ्यामध्ये एका पिकअप वाहनासह, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे महापालिकेच्या तीन रुग्णवाहिका, रुग्णवाहिका, खासगी वॉटर टँकर होते.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Sanket Jadhav