पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले
भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या ट्रेनपैकी एक असलेली आणि आजही लोकांची सेवा करत असलेली पंजाब मेल, १ जून २०२६ रोजी आपल्या गौरवशाली ११५ व्या वर्षात पदार्पण केले. 12137 मुंबई-फिरोजपूर पंजाब मेलने दिनांक ०१.०६.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रस्थान करताना आपल्या प्रवाशांच्या सेवेची ११४ वर्षे पूर्ण केली. यावर्षी पंजाब मेलमध्ये प्रवासी सुविधांच्या उन्नतीकरणासाठी व्यापक सुधारणा करण्यात आल्या असून त्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
बाह्य सजावट: प्रथम वातानुकूलित-द्वितीय वातानुकूलित संयुक्त डबा आणि पॅन्ट्री कारवर वारसा-आधारित संकल्पनांवर आधारित व्हिनाइल रॅपिंग करण्यात आले.
सांस्कृतिक एकात्मता आणि वारसा:
(१) पंजाब मेलचा १९१२ पासूनचा वारसा, महाराष्ट्र-पंजाब यांतील सांस्कृतिक नाते आणि स्वातंत्र्यलढ्याशी असलेला संबंध दर्शविणारी रचना तयार करण्यात आली असून त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया आणि सुवर्ण मंदिर यांच्या स्क्रीन प्रिंट्सचा समावेश आहे.
(२) वातानुकूलित डब्यांच्या आतील भागात जलरोधक कॅनव्हास प्रिंट्स लावण्यात आल्या असून त्यामुळे संग्रहालयासारखा अनुभव मिळतो. तसेच सर्व डब्यांमध्ये एकसमानता राखण्यासाठी वारसा-आधारित फलक लावण्यात आले आहेत.
*स्वच्छता सुधारणा: ऑटो एअर फ्रेशनर्स, सीट कव्हर डिस्पेन्सर्स, सुधारित बिब कॉक, साबण डिस्पेन्सर्स, पीव्हीसी फ्लोअरिंग दुरुस्ती आणि स्क्रेपर मॅट्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
*सामान्य भाग: गँगवे, प्रवेशद्वारे आणि स्वच्छतागृहांमध्ये अधिक टिकाऊपणासाठी व्हिनाइल रॅपिंग करण्यात आले आहे.
दिनांक २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित ट्रेन महोत्सवाच्या निमित्तानेही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रवासी, रेल्वे अधिकारी, रेल्वेप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित ट्रेनपैकी एक असलेल्या पंजाब मेलच्या गौरवशाली प्रवासाचे दर्शन घडविणारे आकर्षक दृकश्राव्य सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली तसेच भारतीय रेल्वेतील पंजाब मेलच्या अग्रगण्य योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
*ऐतिहासिक वारसा*
पंजाब मेल, जी मूळतः "पंजाब लिमिटेड" म्हणून ओळखली जात होती, ही भारतीय रेल्वेतील सर्वात जुन्या ट्रेनपैकी एक आहे. प्रसिद्ध फ्रंटियर मेलपेक्षाही ती १६ वर्षांहून अधिक जुनी आहे. बॅलार्ड पिअर मोल स्टेशन हे एकेकाळी ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे (GIPR) सेवांचे प्रमुख केंद्र होते आणि याच ठिकाणाहून पंजाब मेलने आपल्या प्रवासाची सुरुवात केली.
*प्रवास*
* पंजाब मेल १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पिअर मोल स्टेशनवरून प्रथम धावली, जे त्यावेळी जीआयपीआर (ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे) सेवांचे केंद्र होते.
* ही ट्रेन मुंबईच्या बॅलार्ड पिअर मोल स्टेशनवरून ठरलेल्या दिवशी थेट पेशावरपर्यंत धावत असे, ज्यात २,४९६ किमी अंतर अंदाजे ४७ तासांत कापले जात असे.
* ट्रेनचा मार्ग प्रामुख्याने जीआयपीआर ट्रॅकवरून जात असे आणि पेशावर कॅन्टोन्मेंट येथे थांबण्यापूर्वी इटारसी, आग्रा, दिल्ली आणि लाहोर यांसारख्या प्रमुख शहरांमधून जात असे.
* १९१४ मध्ये, ही सेवा बॉम्बे व्हीटी (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई) येथून सुरू होऊन तेथेच संपू लागली आणि १,५४१ किमीचा बॉम्बे-दिल्ली जीआयपीआर मार्ग २९ तास ३० मिनिटांत पूर्ण करणारी दैनंदिन सेवा बनली.
* १९२० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत, हा प्रवासाचा वेळ आणखी कमी करून २७ तास १० मिनिटे करण्यात आला.
* तथापि, १९७२ मध्ये अतिरिक्त थांबे जोडल्यामुळे प्रवासाचा वेळ पुन्हा २९ तासांपर्यंत वाढवण्यात आला.
* आज, पंजाब मेल मुंबई आणि फिरोजपूर कॅन्टोन्मेंट दरम्यानचे १,९२८ किमीचे अंतर ३३ तास ३५ मिनिटांत पार करते आणि मार्गावर ५२ स्थानकांवर थांबते.
*गेल्या काही वर्षांतील डबे आणि इंजिनप्रणाली*
* मूळतः या ट्रेनला सहा डबे होते: तीन प्रवाशांसाठी आणि तीन टपाल व मालासाठी. तीन प्रवासी डब्यांमधून अंदाजे २८८ प्रवासी प्रवास करत असत.
* १९३० च्या दशकाच्या मध्यात, तृतीय श्रेणीचे डबे सुरू करण्यात आले.
* १९४५ मध्ये, वातानुकूलित डबे सुरू करण्यात आले.
* १९६८ मध्ये, ही ट्रेन झाशीपर्यंत डिझेल इंजिनावर चालवण्यात आली आणि नंतर १९७६ पर्यंत तिचा विस्तार झाशी ते नवी दिल्ली आणि अखेरीस फिरोजपूरपर्यंत करण्यात आला.
* १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात / १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला, इगतपुरीपर्यंत ट्रेन इलेक्ट्रिक इंजिनावर चालवण्यासाठी ड्युअल-करंट लोकोमोटिव्ह (WCAM/1) वापरण्यात आले आणि पुढील प्रवासासाठी इंजिन बदलले जात असे.
* पंजाब मेलच्या पारंपरिक डब्यांच्या जागी एलएचबी (LHB) डबे बसवण्यात आले आणि १ डिसेंबर २०२० पासून ही ट्रेन एलएचबी डब्यांसह धावू लागली.
* ही ट्रेन आता विजेवर चालते आणि तिच्या रेस्टॉरंट कारच्या जागी पॅन्ट्री कार बसवण्यात आली आहे.
* सध्या, ही ट्रेन २५०% पेक्षा जास्त प्रवासी क्षमतेने धावते आणि त्यात खालील संरचनेचा समावेश आहे :
* १ प्रथम वातानुकूलित सह वातानुकूलित द्वितीय श्रेणी, २ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर व्हॅन आणि १ एसएलआर (गार्ड व सामान वाहतूक डबा).
----------------------------
सदर प्रसिद्धीपत्रक डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी केले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
With an MBA in Marketing (First Class with Distinction) and a deep passion for business strategy and innovation, I aim to bring new ideas to life through clarity, creativity, and strong leadership. As the Director of The Global Times, I focus on driving growth, building meaningful collaborations, and creating opportunities that make an impact. My vision is to take our brand to global heights — through digital innovation, smart planning, and ethical business practices. I’m constantly learning, evolving, and planning to pursue my PhD further — because growth never stops.
Krutika Tushar KhanvilkarDedicated to empowering teams, inspiring people, and setting new standards of excellence in the industry.