म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांनी आज मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील वांद्रे (पूर्व) परिसरातील तीन पुनर्विकास प्रकल्पांना भेट देऊन कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रकल्पांची सद्यस्थिती, बांधकामाची गुणवत्ता, प्रगतीचा वेग तसेच रहिवाशांच्या पुनर्वसनासंदर्भातील बाबींची सविस्तर माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
सर्वप्रथम श्री. जयस्वाल यांनी खेरनगर, वांद्रे (पूर्व) येथील श्रीराम गृहनिर्माण संस्थेच्या इमारत क्र. १ मार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वयं-पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी केली. सदर प्रकल्पामध्ये इमारतीच्या १५ मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, श्रीराम गृहनिर्माण संस्थेचा स्वयं-पुनर्विकास प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करावे. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारची प्रशासकीय अथवा तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन कामांना गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
त्यानंतर त्यांनी निर्मल नगर, वांद्रे (पूर्व) येथील पुनर्विकास प्रकल्पाला भेट देऊन पुनर्वसन इमारत विंग-अ मधील कामांची पाहणी केली. तसेच प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रस्तावित स्थलांतरित करावयाच्या रस्त्याच्या जागेचीही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक समन्वय राखण्याच्या सूचना त्यांनी म्हाडा अधिकार्यांना दिल्या. पुनर्वसन इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचना यावेळी विकासकाला दिल्या
यानंतर श्री. जयस्वाल यांनी एमआयजी ग्रुप-६, गांधीनगर, वांद्रे (पूर्व) येथील पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पांतर्गत जुन्या इमारतींचे पाडकाम पूर्ण झाले असून नवीन इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. प्रकल्पाची गती कायम ठेवून बांधकामाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेचे सर्व निकष काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी उपमुख्य अभियंता श्री. भूषण देसाई, कार्यकारी अभियंता श्री. रुपेश तोटेवार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
(वैशाली गडपाले)
मुख्य जनसंपर्क अधिकारी / म्हाडा
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
Tejal KhanvilkarWith an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.