बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश गिरिशिखरांवरून देणारी ग्रिहीथा; ११व्या वर्षीच शंभरी पार
बाल गिर्यारोहक ग्रिहीथा विचारेचा मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव
मुंबई, दि. : सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांपासून ते आंतरराष्ट्रीय पर्वतरांगांपर्यंत आपल्या जिद्दीची पताका फडकावणाऱ्या ११ वर्षीय बाल गिर्यारोहक ग्रिहीथा विचारे हिने अल्पवयातच शंभरहून अधिक गड-किल्ले आणि पर्वतशिखरे सर करून राज्यातील मुलींसमोर प्रेरणेचा नवा आदर्श उभा केला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात तिचा सत्कार करून गौरव केला.
मंत्रालयात आज ग्रिहीथाशी संवाद साधताना मंत्री तटकरे म्हणाल्या, मुलीच्या जन्माचे महत्त्व आणि तिच्या क्षमतांची उंची तुझ्याकडे पाहून समजते. अवघ्या चिमुकल्या वयात यशाची अनेक शिखरे पार करून तू राज्यातील आणि देशातील मुलींसाठी प्रेरणास्थान ठरली आहेस. बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश तू गिर्यारोहणाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचवत आहेस, ही अभिमानास्पद बाब आहे. ग्रिहीथाच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्य शासनामार्फत तिला बाल पुरस्कारासाठी सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
ग्रिहीथा स्नेहा सचिन विचारे हीने अवघ्या ११ व्या वर्षी महाराष्ट्रातील ११० हून अधिक गड-किल्ले, देशातील १८ राज्यांतील ऐतिहासिक दुर्ग तसेच माऊंट एव्हरेस्ट बेस्ड, किलिमंजारो साऊथ आफ्रिका, किनाबालू मलेशीया, बाझारडूझू अझबैजन असे चार आंतरराष्ट्रीय शिखरे सर केली आहेत. वयाच्या सहाव्या वर्षी कुटुंबासमवेत सुरू झालेला तिचा गिर्यारोहणाचा प्रवास आज विक्रमाच्या उंचीवर पोहोचला आहे.
कळसुबाई, भीमाशंकर, अलंग-मदन-कुलंग, गोरखगड, बोरंड्याची नाळ, आधाराई, काळू धबधबा, ढाक भैरी, जीवधन यांसारखे आव्हानात्मक ट्रेक तिने यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. सह्याद्रीतील कठीण समजल्या जाणाऱ्या अनेक मोहिमा पार करताना तिने धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडविले आहे.
संवादादरम्यान ग्रिहीथाने सांगितले की, विविध राज्यांतील गड-दुर्ग सर करताना तिने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश देण्याचा प्रयत्न केला. तिच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. लहान वयातच तिने किलीमांजारोसारख्या आंतरराष्ट्रीय शिखराची मोहीम पूर्ण केली असून, एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान तीव्र थंडी आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत जिद्दीने यश संपादन केले. जगातील प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे स्वप्नही तिने व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
Tejal KhanvilkarWith an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.