ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यव्यापी वृक्षारोपण व संवर्धन मोहीम

पर्यावरण संवर्धनासाठी म्हाडाचे एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

 जैवविविधता वृद्धी, शहरी हरित क्षेत्र विस्तार आणि समुदाय सहभागावर विशेष भर

मुंबई, दि. १२ जून २०२६ : वाढते शहरीकरण, हवामान बदल, प्रदूषण आणि तापमानवाढ या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यंदाही राज्यभर व्यापक वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहीम राबविणार आहे. जुलै महिन्यात साजऱ्या होणाऱ्या वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडाने राज्यभरात एक लाख वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, या मोहिमेद्वारे अधिक हिरवागार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी परिसर निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.


       म्हाडा मुख्यालयात आयोजित वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेच्या नियोजन बैठकीत 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा. प्र. से.) यांनी सर्व विभागीय मंडळांना या मोहिमेचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश दिले.

     यावेळी बोलताना श्री. जयस्वाल म्हणाले की, "वृक्षारोपण ही केवळ एक मोहीम नसून भावी पिढ्यांसाठी पर्यावरणीय जबाबदारी आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीबरोबरच त्यांच्या संवर्धनावर आणि दीर्घकालीन संगोपनावर विशेष भर देणे आवश्यक आहे." १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत राज्यभरातील म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या मोहिमेत स्थानिक परिस्थितीला अनुरूप, पर्यावरणपूरक, देशी प्रजातींची तसेच फळझाडांची लागवड करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. फळझाडांमुळे नागरिकांचा झाडांशी भावनिक संबंध निर्माण होऊन त्यांच्या संगोपनात अधिक सहभाग वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

        म्हाडाने गेल्या वर्षापासून पर्यावरण संवर्धनाला आपल्या सामाजिक बांधिलकीचा अविभाज्य भाग मानले आहे. मागील वर्षी राज्यभरात सुमारे दीड लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे ऐंशी टक्के वृक्ष आजही अस्तित्वात असून त्यांचे संवर्धन केले जात आहे. यामधील सुमारे १,१४,८०० झाडांचे यशस्वी जिओ-टॅगिंग देखील करण्यात आले आहे.  ही बाब वृक्षसंवर्धनाच्या दिशेने म्हाडाच्या प्रयत्नांचे यश दर्शविते.


         या वर्षीच्या मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, रहिवासी कल्याण संघटना (RWA), गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO), पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संघटना तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासकीय जबाबदारी नसून सामूहिक लोकचळवळ बनावी, या उद्देशाने जनजागृती उपक्रमही राबविण्यात यावेत असे देखील यावेळी सूचित केले.

         मुंबई महानगर क्षेत्रातील बांधकाम अथवा विकासासाठी अनुपयुक्त असलेल्या म्हाडाच्या भूखंडांची ओळख पटवून त्या ठिकाणी मियावाकी पद्धतीने घनदाट शहरी वनांची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. कमी जागेत अधिक वृक्षसंख्या आणि समृद्ध जैवविविधता निर्माण करण्यासाठी ही पद्धत प्रभावी ठरत असून शहरी भागातील हरित क्षेत्र वाढविण्यास मोठी मदत होणार आहे.

        तसेच म्हाडाच्या गृहनिर्माण वसाहती, मोकळे भूखंड, सार्वजनिक जागा आणि प्रकल्प परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीचे नियोजन करताना भविष्यातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि इमारतींच्या सुरक्षिततेला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लागवड करण्यात येणाऱ्या प्रत्येक वृक्षाचे जिओ-टॅगिंग करण्यात येणार असून त्याद्वारे वृक्षांच्या वाढीचा आणि संवर्धनाचा नियमित आढावा घेता येणार आहे. तसेच झाडांच्या दीर्घकालीन देखभाल आणि संगोपनाची जबाबदारी स्वयंसेवी संस्था, स्थानिक गृहनिर्माण संस्था, रहिवासी संघटना आणि समुदाय गटांना सोपविण्याचा विचार करण्यात येत आहे. यामुळे वृक्षारोपण उपक्रमाला दीर्घकालीन शाश्वतता प्राप्त होईल.

        म्हाडाच्या पूर्ण झालेल्या प्रकल्पांमधील रहिवाशांचा सहभाग वाढवून प्रत्येक वसाहतीत हरित क्षेत्र विकसित करण्याचा मानस असून, खासगी जागांवर जमीनमालकांच्या संमतीने फळझाडे लावण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे स्थानिक स्तरावर पर्यावरण संरक्षणाबाबत मालकीची भावना निर्माण होऊन वृक्षांचे संगोपन अधिक प्रभावीपणे होईल. 

       यंदाच्या मोहिमेत ५ ते ६ फूट उंचीची आणि २ ते ३ वर्षे वयोमानाची निरोगी रोपे लावण्यावर भर देण्यात येणार आहे. अधिक टिकावू वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, कार्बन शोषण क्षमता वाढविणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करणे हे या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे श्री. जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

      वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून, या मोहिमेत सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून पर्यावरण संरक्षणाच्या सामूहिक प्रयत्नांना बळ द्यावे, असे आवाहन श्री. जयस्वाल यांनी केले.

रिपोर्टर

  • Anoop chandrakant chavan
    Anoop chandrakant chavan (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Anoop chandrakant chavan

संबंधित पोस्ट