ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

*वावोशी येथे 'खेत बचाओ अभियान' आणि 'मेरा गाँव मेरा गौरव' शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न...*


*मृदा आरोग्य, नैसर्गिक शेती आणि मत्स्य व्यवसायातील संधींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित*

वावोशी /जतिन मोरे : खालापूर तालुक्यातील वावोशी येथे १० जून रोजी 'खेत बचाओ अभियान', 'मेरा गाँव मेरा गौरव', "खतांचा संतुलित वापर" आणि 'El Niño' जनजागृती कार्यक्रमांतर्गत एका विशेष शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम ICAR-Central Institute of Fisheries Technology (ICAR-CIFT), मुंबई संशोधन केंद्र ; कृषि विज्ञान केंद्र, किल्ला-रोहा (रायगड); महाराष्ट्र शासन कृषी विभाग (तालुका कृषि अधिकारी कार्यालय खालापूर) आणि ' आत्मा' यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थित राहून विविध शासकीय योजना व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

*'सुदृढ जमीन - सुदृढ पीक - समृद्ध शेतकरी' हीच काळाची गरज*

या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आणि MRC, ICAR-CIFT, मुंबई येथील शास्त्रज्ञ डॉ. अभय कुमार यांनी "Healthy Soil – Healthy Crop – Prosperous Farmer" या संकल्पनेवर आधारित संतुलित खत व्यवस्थापन या विषयावर सविस्तर प्रकाश टाकला. मृदा परीक्षणावर आधारित खतांचा वापर, रासायनिक व सेंद्रिय खतांचा समतोल, जमिनीचे आरोग्य संवर्धन आणि शाश्वत शेतीचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. तसेच कंपोस्ट निर्मिती तंत्रज्ञान, सेंद्रिय पदार्थांचे व्यवस्थापन आणि ICAR-CIFT द्वारे विकसित "CIFT Micro Boost" या जैवउत्पादनाचे फायदे सांगताना ते म्हणाले की, "या उत्पादनामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची वाढ होते, पोषक तत्त्वे सहज उपलब्ध होतात आणि पीक उत्पादकता वाढते." याशिवाय त्यांनी मत्स्य संवर्धन, मत्स्य प्रक्रिया, मूल्यवर्धित मत्स्य उत्पादने आणि मत्स्य व्यवसायातील उद्योजकतेच्या संधींविषयीही शेतकऱ्यांना अवगत केले.

*तज्ज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन*

या कार्यक्रमात कृषी आणि मत्स्य क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. जीवन आरेकर (विषय विशेषज्ञ, केव्हीके, किल्ला-रोहा) यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व सांगून दशपर्णी अर्क, बीजामृत, जीवामृत व धनजीवामृत तयार करण्याबाबत सविस्तर माहिती दिली. माधव गीते (मत्स्य विषय विशेषज्ञ) यांनी मत्स्यपालन व मत्स्य प्रक्रिया उद्योगातील रोजगाराच्या व व्यवसायाच्या नवीन संधींवर मार्गदर्शन केले. तर डॉ. सचिन कार्ले (मृदा विज्ञान विषय विशेषज्ञ) यांनी माती नमुना संकलन, जमीन आरोग्य पत्रिका आणि जमिनीतील उपयुक्त जिवाणू संवर्धन याविषयी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

*शासकीय योजनांची माहिती*

कृषी विभागाच्या वतीने कृषी अधिकारी सुरेश उघडा यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी नाजीम मुलानी व सहाय्यक कृषी अधिकारी मुकाजी शेटे यांनीही शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून विविध तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले.

*नियोजन आणि यशस्वी व्यवस्थापन*

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी सखी दर्शना पवार व श्रीमती दर्शना शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आत्मा च्या बी.टी.एम. प्रज्ञा पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. तसेच MRC, ICAR-CIFT, मुंबई येथील तांत्रिक सहाय्यक तुळशीराम वाघमारे, यंग प्रोफेशनल्स सूरज धर्मा पाटील आणि श्वेता महेंद्र मांगले यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन, समन्वय, तांत्रिक सहाय्य व व्यवस्थापन सांभाळून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात मोलाचे योगदान दिले. या सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमामुळे वावोशी व परिसरातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य, संतुलित खत व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, मत्स्य व्यवसाय आणि शासकीय योजनांविषयी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक माहिती मिळाली ज्याचा फायदा आगामी खरीप हंगामात नक्की होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट