ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

काळाबाजार, साठेबाजी आणि वाढत्या गैरव्यवहारांना रोखण्यासाठी एका दिवसाला फक्त २०० लीटरच डिझेल घेता येणार

नवी दिल्ली: आता एका ग्राहकाला किवा वाहनाला किरकोळ विक्री पेट्रोल पंपावरून एका दिवसात जास्तीत जास्त २०० लीटर डिझेलच खरेदी करता येईल. देशातील डिझेलचा काळाबाजार, साठेबाजी आणि वाढत्या गैख्यवहारांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय शुक्रवारी घेतला. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 'मोटार स्पिरीट आणि हाय-स्पीड डिझेल आदेश, २०२६' अधिसूचना जारी केली. हे नियम तात्पुरत्या स्वरूपाचे असून सुरुवातीला २० दिवसांसाठी लागू राहतील. याद्वारे सामान्य ग्राहकांसाठी डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवला जाणार आहे.

काळाबाजार रोखण्यासाठीचे नियम पंपावरून खरेदी केलेल्या डिझेलची पुन्हा विक्री (ब्लॅक मार्केटिंग) करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली. डिझेल थेट वाहनांच्या टाकीत किंवा फक्त 'पेसो' मान्यताप्राप्त अधिकृत कंटेनरमध्येच भरून दिले जाईल. जेरीकेन (कॅपे) किंवा इतर बेकायदेशीर डब्यांमध्ये डिझेल देण्यास मनाई असेल. औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक बड्या ग्राहकांना रिटेल पंपांवरून डिझेल खरेदी करता येणार नाही. त्यांना त्यांच्या हक्काच्या 'कंझ्युमर पंपांवरूनच खरेदी करावी लागेल.

सामान्य जनतेवर काय परिणाम होणार ? या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. कार, दुचाकी किंवा वैयक्तिक वाहन चालवणाऱ्या सामान्य माणसासाठी दिवसाला २०० लीटरची मर्यादा खूप मोठी आहे. उलट, या निर्णयामुळे इंधनाची चोरी थांबेल आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी पंपांवर पुरेसे डिझेल उपलब्ध राहील, असे सरकारचे म्हणणे आहे.
५०० कोटींचे नुकसान सोसून जनतेला दिलासा पश्चिम आशियातील तणावामुळे सध्या पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजीच्या विक्रीवर सरकारी तेल कंपन्या दररोज सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान सहन करत आहेत, असे सरकारचे म्हणणे आहे. हा दिलासा केवळ शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि घरगुती ग्राहकांसाठी आहे, बड्या उद्योगांसाठी नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
नियम मोडल्यास कडक कारवाई ! या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खरेदीदार, पेट्रोल पंप चालक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर 'अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५' अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई आणि दंडात्मक तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना यावर कडक देखरेख ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट