२० जूननंतरच महाराष्ट्र पाऊस बरसणार
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली माहिती
मुंबई : जरी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असले तरी राज्यातील अनेक भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सुरुवातीला भारतीय हवामान विभागाने (IMD) 15 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, मान्सूनची गती मंदावल्याने हा अंदाज बदलला असून, आता 20 जूननंतरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, 20 जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची आणि राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
यंदाच्या मान्सूनवर 'अल निनो'चा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची भीती व्यक्त केली जात असली, तरी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे.
पंजाबराव डख यांच्या मते, मान्सूनची वाटचाल सध्या मंदावली असली तरी शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभर जोरदार पाऊस होईल. तसेच, यंदा दुष्काळ पडेल, असे दावे चुकीचे असून
परतीचा पाऊसही चांगला होईल. त्यामुळे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांतील पिकांसाठी परिस्थिती अनुकूल राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, राज्यभर समाधानकारक पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times