डोळवहाल पाणीपुरवठा योजनेचा वाढता खर्च लक्षात घेऊन पाणीपट्टी वाढ; रोहे अष्टमी करांना पाणी देण्यास आम्ही कटिबद्ध, शहर स्वच्छते बरोबर उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील – नगराध्यक्षा वनश्री शेडगे
रोहा प्रतिनिधी :- रोहा-अष्टमी नगरपरिषदे तर्फे 2003 साली खा. सुनिल तटकरे यांचे प्रयत्नानी डोळवहाल पाणीपुरवठा कार्यान्वित करण्यात आली. शहराच्या वाढत्या लोकसंख्ये नुसार आज योजनेवर वाढत्या खर्चाचा ताण पडत असून, नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी अनेक वर्षांनंतर पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा यासाठीप्रशासनाने सुचविलेल्या दरापेक्षा कमी दर निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरपरिषदेच्या आकडेवारीनुसार सन 2025-26 मध्ये पाणीपट्टीतून सुमारे 1 कोटी 36 लाख 49 हजार 676 रुपये उत्पन्न मिळाले असून, पाणीपुरवठा विभागाचा अपेक्षित खर्च 3 कोटी 2 लाख 75 हजार रुपये इतका आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना मोठ्या प्रमाणात तोट्यात चालत असल्याचे स्पष्ट होत आहे.
एल निनोच्या परिणामामुळे पावसाचे प्रमाण घटल्याने भविष्यात पाण्याची उपलब्धता आणि व्यवस्थापन हे मोठे आव्हान ठरणार आहे. दुसरीकडे वीजबिलात झालेली वाढ, कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढ, कच्च्या पाण्याच्या देयकांमध्ये झालेली वाढ, महागाई आणि पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीवरील वाढता खर्च यामुळे पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगराध्यक्षा शेडगे यांनी सांगितले.
शासनाच्या नियमानुसार पाणीपट्टीमध्ये वार्षिक 3,600 रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित होती. मात्र सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून नगरपरिषदेने ही वाढ कमी करत 2,800 रुपये इतकी ठेवली असल्याचे त्यांनी नमूद केले.एल निनो च्या परिणामासाठी आपण सर्वांनी वेळीच जागृत होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगत शहरातील नैसर्गिक विहिरी जतन करणे, बोलवेअर देखभाल दुरुस्ती याकडे लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगत यासंदर्भात शहरातील सर्व गृहनिर्माण संस्था, नागरिक यांची लवकरच बैठक बोलावत मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहरातील नाले सफाई बद्दल नागरिकांचे मधून समाधान व्यक्त होत असल्याचे सांगितले.शहराच्या प्रवेशद्वारावर खाजगी जागांचा भंगार व्यवसायासाठी व्यावसायिक वापर होत नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत होते हे लक्षात घेत सर्व यासर्व जागांवर मागील 6 वर्षांची मालमत्ता कर आकारणी केली.नगरपरिषद सर्व शाळांचे मध्ये शैक्षणिक दर्जा हा दिवसेंदिवस उंचावत असल्यामुळे विद्यार्थी प्रवेशात समाधान कारक वाढ होत. डॉ. सी डी देशमुख विद्यालयाची आदिवासी विद्यार्थिनी दहावी मध्ये 91% टक्के गुण मिळवत उत्तीर्ण होते याचा मनस्वी आनंद व समाधान असल्याची भावना नगराध्यक्षा शेडगे यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, पाणीपुरवठा सभापती महेंद्र दिवेकर, मुख्याधिकारी अजय एडके, पर्यटन व नियोजन सभापती महेश कोलाटकर, शिक्षण सभापती रविंद्र चाळके,महिला बालकल्याण सभापती नीता हजारे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, नगरसेवक अजित मोरे, प्रशांत कडू, पूर्वा मोहिते, फराह पानसरे तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
"नगरपरिषद 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर शहराला पाणीपुरवठा करत आहे. पाणीपुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेला खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. किल्ला येथे नव्याने जकवेल उभारून शहरात पाणी आणण्यासाठी योजनेचा प्रस्ताव खा. सुनिल तटकरे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाला देण्यात आला आहे. हे काम झाल्यावर देखभाल दुरुस्ती खर्च कमी होत पाण्याची गळती ही रोखण्यात मदत होईल.नागरिकांच्या पाणीपट्टीबाबत काही शंका अथवा गैरसमज असल्यास त्यांचे निरसन करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी नागरिकांनी नगरपरिषदेसोबत संवाद साधावा. रोहेकरांना अखंड व पुरेसा पाणीपुरवठा देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी असून त्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत."
महेंद्र दिवेकर
(सभापती, पाणीपुरवठा समिती, रोहा-अष्टमी नगरपरिषद) :
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times