६० वयाचे कारण देत अचानक कामावरून काढून टाकलं एनडीज् स्टुडियोतील कामागारांवर उपासमारीची वेळ
खोपोली - सारिका सावंत :- कलादिग्दर्शक नितीन देसाईच्या निधनानंतर शासनाने दोन वर्षापुर्वी ताब्यात घेतल्यापासून कामगारांना पगार वाढ नाही,कोणतीही सुविधा नाही,कायमस्वरूपी कामगारांना कोणतेही पूर्व कल्पना न देता काँट्रँक्टमध्ये वर्ग केले आहे.
बारकू तरे या कामागाराला कामावर असताना ह्दयविकाराच्या झटका आला. रूग्णालयात घेवून जाण्यासाठी रूग्णवाहीका नसल्यामुळे दुचाकीवरून रूग्णालयात घेवून जावे लागले.रूग्णालयातात वेळेवर पोहचले नसल्यामुळे तरे यांचा दुदैवी मृत्यु झाला. बारकू तरेच्या कुटूंबाला कोणतीही आर्थिक मदत केली नसल्यामुळे कामगारांनी आक्रामक पवित्रा घेवून प्रसारमाध्यमांकडे व्यथा मांडल्याने एनडीज् आर्ट वर्ल्ड स्टुडियो प्रा.लि कंपनीच्या प्रशासनाने ६० वर्षाचा वयाच कारण देत जवळपास १४ कामगारांना काढल्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.
कंपनी प्रशासनाने अधिक वय असल्याचे सांगत मुख्य गेटवरून प्रवेश देवू नये असा परिपत्रक काढले आहे.
खालापूरातील कर्जत- चौक रस्त्यावरील एनडी स्टुडियो स्थानिक कामगार अनेक वर्षापासून काम करीत आहेत.कलादिग्दर्शक नितीन देसाई असताना कामगारांना वेळेवर पगार आणि सर्व सुविधा मिळत होत्या तसेच कामागारांचा मानसन्मान राखला जात होता मात्र राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी एनडी स्टूडियो ताब्यात घेतला आहे.तेव्हापासून याठिकाणी एकही शुटींग सुरू नाही तसेच दादांबरोबर अनेक वर्ष कामगारांना ३०० रूपयात राबवितात मात्र नवीन कामगारांना ३० हजाराच्या पुढे पगार देताना टेंडर प्रोसेस लागू नाही का ? अशी प्रचंड नाराजी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केल्याने काही कामागारांनी नोटीस बजावली आहे तर ६० वर्षाच्या वयाचे कारण देत सुरक्षा रक्षक आणि इतर कामागारांना अचानक कामावरून काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कामगारांनी एनडीज् स्टुडियोच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जमून या घटने बाबत नाराजी व्यक्त केली आहे.
एनडीज् स्टुडियो सुरू झाल्यापासून नितीन देसाई यांच्या समवेत काम केल असून संपूर्ण आयुष्यभर श्रम केले आहे.सेवानिवृत्ती देताना मानसन्मान न देता तडकाफडकी कामावरुन काढून टाकणे निंदनीय आहे.शासनाने आम्हाला सेवानिवृत्ती निमित्ताने हिशोब द्यावा अशी मागणी कामगारांनी केली आहे
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times