ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात


मुंबईः देशातील पहिल्या पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून, २०२७ अखेरपर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या निर्मितीतील प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर एमडीएल आता पर्यटकांसाठी विशेष २४ आसनी सबमरीन उभारण्याबरोबरच तिच्या संचालनासाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक प्रणाली विकसित करत आहे.

सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील देशातील पहिल्या अंडरवॉटर पर्यटन प्रकल्पासाठी तयार होणारी ही अत्याधुनिक पाणबुडी 'ट्रिटॉन डीपव्यू-२४ च्या धर्तीवर असणार आहे. विशेष क्रेलिक प्रेशर हल आणि पॅनोरॅमिक व्हाइंग डोममुळे समुद्रात उतरल्यावर काचा जवळपास अदृश्य झाल्याचा भास निर्माण होणार असून, पर्यटकांना ३६० अंशातून सागरी विश्वाचे विहंगम दर्शन घेता येणार आहे. रंगीबेरंगी प्रवाळ, विविध प्रजातींचे मासे, सागरी वनस्पती आणि 'एक्स आयएनएस गुलदार भोवती विकसित होणाऱ्या कृत्रिम प्रवाळभित्तींचा थरारक अनुभव या सफरीत मिळणार आहे. या प्रकल्पामुळे देशात प्रथमच सर्वसामान्य पर्यटकांना समुद्राच्या तळाशी जाऊन सागरी जैवविविधतेचा

अनुभव घेता येणार आहे. १४ तास समुद्रात राहण्याची क्षमता पूर्णपणे बॅटरीवर चालणारी आणि शून्य कार्बन उत्सर्जन करणारी ही पाणबुडी अत्याधुनिक सुरक्षा प्रणालींनी सुसज्ज असेल. उच्च क्षमतेच्या २४० किलोवॅट-तास बॅटरी, दोन मुख्य २० किलोवॅट भ्रस्टर्स, चार सहाय्यक भ्रस्टर्स, ऑक्सिजन पुरवठा प्रणाली, कार्बन डायऑक्साइड शोषण यंत्रणा, दुहेरी बीजपुरवठा आणि आपत्कालीन ऊर्जा व्यवस्था यांचा त्यात समावेश असेल, सलग १४ तास समुद्रात कार्यरत राहण्याची क्षमता असलेल्या या पाणबुडीचे नियंत्रण जॉयस्टिक, टचस्क्रीन आणि मॅन्युअल ओव्हरराइड प्रणालीद्वारे करता येणार आहे. वातानुकूलित केबिन आणि कमी आवाजाची यंत्रणा यामुळे ज्येष्ठ नागरिक

आणि लहान मुलांनाही सुरक्षितपणे हा अनुभव घेता येणार आहे. पाणबुडीची संपूर्ण इकोसिस्टम एमडीएलकडून केवळ सबमरीनची निर्मितीच नव्हे, तर तिच्या सुरक्षित आणि अखंड संचालनासाठी आवश्यक असलेली संपूर्ण इकोसिस्टम उभारण्याचे कामही सुरू आहे. यामध्ये चार्जिंग सुविधा, डॉकिंग स्टेशन, नियंत्रण कक्ष, देखभाल केंद्र, संप्रेषण प्रणाली, बॅटरी व्यवस्थापन यंत्रणा आणि

आपत्कालीन प्रतिसाद प्रणालींचा समावेश आहे. समुद्रातील बदलत्या हवामानाचा आणि भरती ओहोटीचा विचार करून आंतरराष्ट्रीय सुरक्षामानकांनुसार या सुविधा विकसित केल्या जात आहेत. 'मेक इन इंडिया'ला नवी दिशा पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या पाणबुड्या आतापर्यंत परदेशातून आयात केल्या जात होत्या. मात्र, स्कॉर्पिन वर्गातील पाणबुड्या आणि अत्याधुनिक युद्धनौकांच्या निर्मितीतील अनुभवाच्या बळावर एमडीएल ही क्षमता देशात विकसित करत आहे. संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान पर्यटन क्षेत्रात वापरण्याचा हा देशातील पहिलाच प्रयत्न ठरत असून, त्यामुळे 'मेक इन इंडिया' उपक्रमाला मोठी चालना मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्ग हे देशातील पहिले सबमरीन पर्यटन केंद्र म्हणून उदयास येण्याची अपेक्षा आहे.             

आसन क्षमता: २४ प्रवासी

लांबी : १५.४ मीटर

उंची: ३.६ मीटर

रुंदी : ३.६ मीटर

वजन : ५५ टन

बॅटरी क्षमता: २४० ज्ञथह समुद्रात कार्यरत राहण्याची

क्षमता : १४ तास

गती : ३ नॉट्स

३६० अंश पॅनोरॅमिक दृश्य पूर्णपणे बॅटरीवर चालणारी शून्य कार्बन उत्सर्जन वातानुकूलित केबिन                                                              

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट