ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशी येथे सकाळच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला.


भरधाव डंपरची जोरदार धडक; दुचाकीवरील महिला अक्षरशः हवेत फेकली गेली अन्....

हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशीमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना

हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशी येथे सकाळच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात  घडला. एका भरधाव येणाऱ्या डंपरने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात डंपरच्या चाकाखाली चिरडून जाकादेवी येथील पांचाळ कुटुंबातील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीला धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटलेला डंपर महामार्गावरून थेट खाली कोसळला आणि याच डंपरखाली दाबले गेल्याने महिलेला आपले प्राण गमवावे लागले.

धडक बसताच दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली अन्

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जाकादेवी येथील पांचाळ कुटुंब दुचाकीवरून प्रवास करत असताना, खेडशी परिसरामध्ये पाठीमागून येणाऱ्या एका अनियंत्रित आणि वेगवान डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक बसताच दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली आणि डंपरच्या थेट खाली आली. दुचाकीला उडवल्यानंतर डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले त्यामुळे , डंपर रस्त्याच्या खाली कोसळत असताना ती महिलाही डंपरच्या खालीच दबली गेली, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

 एकाच ठिकाणी 2 अपघात, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा,

विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे, आज सकाळी ज्या ठिकाणी हा डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला, त्याच ठिकाणी काही वेळापूर्वीच एका रिक्षाचाही अपघात झाला होता. त्यामुळे हा परिसर आज सकाळी अपघाताचे केंद्र बनला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, डंपर महामार्गावरून खाली कोसळल्याने आणि मोठी गर्दी जमल्याने हातखंबा-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, या घटनेमुळे संपूर्ण जाकादेवी आणि खेडशी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट