विरारमध्ये महापालिकेच्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग
बस जळून खाक
वसई: वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील एका इलेक्ट्रिक बसला चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर अचानक भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी पडली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण बसला वेद्या घातल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली, सुदैवाने बसमध्ये कोणतेही प्रवासी किंवा कर्मचारी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेमुळे ३ बसच्या सुरक्षिततेवावत गंभीर प्रश्र उपस्थित होत आहेत.
बिरार पश्चिम येथील वसई-बिरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयामागे परिवहन विभागाच्या इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग डेपो आहे. शुक्रवारी दुपारी सुमारे २ च्या सुमारास डेपोमध्ये उभी असलेल्या एका इलेक्ट्रिक बसला अचानक आग लागली. सुरुवातीला धूर दिम् लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण चन आगीच्या विळख्यात सापडली. घटनेची माहिती मिळताच
डेपोतील कर्मचाऱ्यांनी तातडीने महापालिकेच्या अप्रिशमन दत्ताला कळवले, अग्रिशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की ज्वाळांचे लोळ पसरले होते. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर कुलिंगचे कामही करण्यात आले.
या आगीत इलेक्ट्रिक बस पूर्णपणे जळून खाक झाली असून लाखों रुपयांचे नुकसान
झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागली तेव्हा बस डेपोमध्ये उभी असल्याने आणि त्यामध्ये कोणीही प्रबासी नसल्याने जीवितहानी टळली. आग नेमकी कशामुळे लागली, चार्जिग प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक बिघाड झाला होता का याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या इलेक्ट्रिक बसच्या देखभाल, चार्जिंग व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times