अपंगत्वावर मात करत विघ्नेशची यशस्वी भरारी; दहावीत ७७ टक्के गुण मिळवत ठरला प्रेरणादायी विद्यार्थी
जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाच्या बळावर विघ्नेश प्रवीण गायकवाडने घडवला आदर्श;
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विशेष गौरव
कर्जत :- शारीरिक अपंगत्वाला कधीही आपल्या प्रगतीच्या आड येऊ न देता जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर नेरळ येथील विघ्नेश प्रवीण गायकवाड याने दहावीच्या परीक्षेत ७७ टक्के गुण मिळवत प्रेरणादायी यश संपादन केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याने उभारलेला हा यशाचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अंध-अपंग विकास संस्था, वारे आणि अंध-अपंग सामाजिक विकास संस्था, नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ येथे आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यात विघ्नेशचा विशेष सत्कार करण्यात आला.तालुक्यातील कानाकोपऱ्यातून येथे उत्तीर्ण विद्यार्थी सहभागी झाले होते.विघ्नेशच्या जिद्दीचे आणि शैक्षणिक यशाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत इतर विद्यार्थ्यांनीही त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमात कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती चित्रा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे, पंचायत समिती सदस्या नमिता श्रीखंडे, अक्षय तिटकोरे, उद्योजक श्रीराम राणे आणि डॉ. निर्मला राव यांची प्रमुख उपस्थिती होती व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अपंगत्व हे यशाच्या वाटेतील अडथळा नसून, जिद्द, आत्मविश्वास आणि शिक्षणाची ओढ असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, हे विघ्नेशने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.असे मत पंचायत समितीच्या उपसभापती चित्रा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे, यांनी कार्यक्रमात व्यक्त केले, विघ्नेशच्या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण नेरळ परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times